मराठमोळ्या अभिनेता Bhushan Pradhan ने एका मुलाखतीत ‘छावा’ सिनेमातील भूमिका नाकारण्याबद्दल आपले विचार मांडले. विकी कौशल च्या ‘छावा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाल माजवली असली तरी, भूषणला देखील या सिनेमामध्ये एक भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्याने ती ऑफर नाकारली. या निर्णयाबद्दल तो म्हणाला, “आयुष्यात आपल्याला अनेक गोष्टी मिळतात, पण त्या गोष्टींना ‘हो’ म्हणायचं आणि ‘नाही’ म्हणायचं, ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ‘छावा’ मध्ये सुद्धा एक भूमिका मिळाली होती, पण मला असं वाटलं की मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आधीच साकारली आहे. हिंदी सिनेमात त्याच प्रकारच्या भूमिकेसाठी मी तयार नाही. त्यामुळे ‘नाही’ म्हणणं योग्य ठरलं.”
भूषण प्रधानचं तत्त्व आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया:
भूषण प्रधान सांगतो की, “केवळ एक मोठा चित्रपट असण्यामुळे तो स्वीकारणं योग्य ठरत नाही. मी तत्त्वांवर विश्वास ठेवतो. ‘जय भवानी जय शिवाजी’ मध्ये जेव्हा शिवाजी महाराजांची भूमिका साकारली, तेव्हा त्याला पुरेपूर न्याय देण्यासाठी मी सखोल अभ्यास केला. आता हिंदी चित्रपटांमध्ये देखील अशी भूमिका स्वीकारताना मी याच पद्धतीने विचार केला.”
‘जय भवानी जय शिवाजी’ च्या शूटिंगचा भावनिक अनुभव:
‘जय भवानी जय शिवाजी’ सिरीजचं शूटिंग संपल्यानंतर भूषण प्रधानला भावनिक धक्का बसला नव्हता, हे तो सांगतो. तो म्हणाला, “जेव्हा ‘जय भवानी जय शिवाजी’ चा शेवटचा दिवस होता, तेव्हा मी फार भावूक झालो नाही. मी आई-बाबांना सांगितलं, त्यांचं लक्षात आलं, पण मी स्वतःला समजावत होतो की, हे काम आपल्यासाठी खूप मोठं आहे. महाराजांची भूमिका मिळणं हे भाग्य आहे.”