walmik karad प्रकरण: एक नवीन वळण?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या निर्घृण हत्येनंतर चार महिन्यांनी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेत मुख्य मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर आले आहे.
walmik karad फिल्म इंडस्ट्रीशी संबंध?
आता या प्रकरणाला आणखी एक नवे वळण मिळाले आहे. बीडच्या सायबर विभागातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी मोठा दावा केला आहे की walmik karad हा एक फिल्म प्रोड्यूसर होता. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
BRJ फिल्म प्रोडक्शन आणि इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर असोसिएशनचे सभासदत्व
सोशल मीडियावर काही फोटोज व्हायरल झाले आहेत, ज्यात:
- walmik karad चे आयडी कार्ड
- मुंबईतील बीकेसी (BKC) मधील एका प्रॉडक्शन ऑफिसचे फोटो
- BRJ फिल्म प्रोडक्शनशी त्याचा संबंध असल्याचे पुरावे
या व्हायरल फोटोंमध्ये त्याला इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर असोसिएशनचा (IMPPA) आजीवन सभासद म्हणून देखील दाखवले जात आहे.
राजकीय आणि गुन्हेगारी संबंध?
वाल्मिक कराडचे राजकीय आणि गुन्हेगारी जगतात मोठे नेटवर्क असल्याची चर्चा आहे. काही रिपोर्ट्सनुसार, तो केवळ फिल्म इंडस्ट्रीत नव्हता तर गुन्हेगारी कनेक्शनही मजबूत होते.
याआधी त्याचे नाव बीड जिल्ह्यातील विविध आर्थिक आणि राजकीय वादांमध्ये समोर आले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीत याची अजून सखोल तपासणी होणार आहे.
सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही लोकांचा विश्वास आहे की वाल्मिक कराड हा प्रत्यक्षात गुन्हेगारी जगतातील मोठा मास्टरमाईंड आहे आणि फिल्म प्रोड्यूसर ही केवळ त्याची बनावट ओळख आहे