Cars and Launches
lifestyle Tech Updates

April 2025 मध्ये येणाऱ्या Upcoming Cars आणि Launches!

Spread the love

आशा असलेल्यांकरिता April 2025 मध्ये भारतात काही नवीन आणि दमदार Cars Launches होणार आहेत. जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पुढील काही महिन्यांत भारतीय बाजारपेठेत अनेक ईव्ही आणि पेट्रोल-डिझेल कार लॉन्च होणार आहेत. चला, तर मग जाणून घेऊया एप्रिल 2025 मध्ये लॉन्च होणाऱ्या कार्सची यादी.

मारुती ई-विटारा:

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार, ई-विटारा, एप्रिल 2025 मध्ये भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही एक मिड साइज इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल आणि याची रेंज सुमारे 500 किमी असू शकते. ई-विटारा, टाटा कर्व्ह ईव्ही, एमजी झेडएस ईव्ही, ह्युंदाई क्रेटा ईव्ही आणि महिंद्राच्या बीई 05 ला कडी टक्कर देईल.

किआ केरेन्स फेसलिफ्ट:

किआ ने नवीन केरेन्स फेसलिफ्ट एप्रिल 2025 मध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या मॉडेलमध्ये नवीन डिझाइन, फीचर्स आणि इंटीरियर्स समाविष्ट असतील. हे मॉडेल नवीन कॅरेन्स म्हणून विकले जाईल.

टाटा हॅरियर ईव्ही:

टाटा मोटर्स हॅरियर ईव्ही लॉन्च करणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिक विशेष डिझाइन आणि फीचर्स असतील. या एसयूव्हीमध्ये नवीन ब्लॅंक-ऑफ ग्रिल, सुधारित एअर डॅम आणि नवीन स्किड प्लेट्स दिसतील.

निसान मॅग्नाइट सीएनजी:

निसान मॅग्नाइट सीएनजी व्हर्जन एप्रिलमध्ये लॉन्च होणार आहे. यात 1.0 लीटर नॅचरल-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल, ज्याला डीलरशिप स्तरावर सीएनजी किट बसवला जाईल. मायलेज 25 किमी / किलोपर्यंत असू शकतो.

एमजी सायबरस्टर आणि एम 9 ईव्ही:

एमजी मोटर इंडिया सायबरस्टर आणि एम 9 ईव्ही लाँच करणार आहे. सायबरस्टर एक इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार असून ती 3.2 सेकंदात 0-100 किमी/तास वेग पकडू शकते. याची रेंज 580 किमी असू शकते. एम 9 हा एक लक्झरी ईव्ही असून त्याची रेंज 430 किमी असू शकते.

MG सायबरस्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *