Rain Alert Today : शेतकऱ्यांचे नुकसान, IMD कडून अवकाळी पावसासाठी Yellow Alert -मुंबईसह १० जिल्हेराज्यभरातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाच ते सात एप्रिल दरम्यान मुंबईसह इतर काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. हवामान विभागानुसार, मुंबई आणि इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक वादळी वाऱ्यांसह पाऊस होईल. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, आणि त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागतो आहे. अवकाळी पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आले आहे.
तसेच, हवामान विभागाने पुढील २४ तासांत पावसाचे सावट गायब होऊन तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे राज्यात उकड्याच्या वातावरणाची स्थिती होऊ शकते.
