डोनाल्ड ट्रम्प यांनी 2025 मध्ये अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली, मात्र त्यांच्या दुसऱ्या टर्मच्या शपथविधी दरम्यान, एक वेगळीच चर्चा सुरू झाली. गुगलवर ट्रम्प यांचे नाव नव्हे, तर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांच्या पत्नी उषा चिलुकूरी वेन्स यांचे नाव सर्वाधिक सर्च केले गेले. विशेषतः उषा यांच्या धर्माबद्दलचा प्रश्न सर्वाधिक ट्रेंडमध्ये होता.
उषा वेन्स यांची अमेरिकेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण भूमिका असलेली छबी तयार झाली आहे. त्यांना पहिल्या भारतीय-अमेरिकन सेकंड लेडी म्हणून ओळखले जात आहे, आणि ट्रम्प यांच्या शपथविधीतील हा क्षण भारतीय-अमेरिकन समुदायासाठी ऐतिहासिक ठरला.
उषा वेन्स – भारतीय कुटुंबाची कथा:
उषा वेन्स यांचा जन्म 6 जानेवारी 1986 रोजी सॅन डिएगो, कॅलिफोर्नियात झाला. उषाचे कुटुंब दक्षिण भारतातील असून तिचे आजोबा विशाखापट्टणममध्ये राहणारे होते. उषाची आजी निवृत्त भौतिकशास्त्र प्राध्यापक आहे, आणि तिचे वडील आयआयटी मद्रासमधून पास आऊट झालेले मेकॅनिकल इंजिनिअर आहेत, तर तिची आई आण्विक जीवशास्त्रज्ञ म्हणून काम करत होती. उषा यांचे कुटुंब 1980 च्या दशकात अमेरिकेत स्थायिक झाले.
शिक्षण आणि करिअर:
उषा यांचे प्रारंभिक शिक्षण माउंट कार्मेल हायस्कूलमधून झाले. त्यानंतर, येल युनिव्हर्सिटीमधून इतिहासात अंडरग्रेजुएट पदवी घेऊन, उषा यांनी येल लॉ स्कूलमधून ज्युरीस डॉक्टर पदवी प्राप्त केली. येल लॉ जर्नलच्या कार्यकारी संपादक आणि येल जर्नल ऑफ लॉ अँड टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थापकीय संपादक म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
2013 मध्ये येल लॉ स्कूलमध्ये शिकत असताना उषा आणि जेडी वेन्स यांची भेट झाली आणि या जोडप्याला तीन अपत्यं देखील आहेत.
उषा वेन्स आणि धर्मावर चर्चा:
जेव्हा उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांनी शपथ घेतली, तेव्हा उषा वेन्सची भूमिका त्यांच्या पाठीशी उभे राहून एक ऐतिहासिक टप्पा गाठणारी ठरली. त्याचवेळी, त्यांच्या धर्मावर सोशल मीडियावर आणि गुगलवर चर्चांचा सैलाब आला. “उषा वेन्स धर्म” या सर्च वाक्यांमध्ये प्रचंड वाढ दिसून आली, विशेषतः अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, यूके आणि भारतात.