ICC Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. कर्णधार Rohit Sharma आणि संपूर्ण टीमच्या खेळाची जगभरातून प्रशंसा होत आहे. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतर माजी अष्टपैलू खेळाडू Yuvraj Singh च्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे नवीन चर्चा सुरू झाली आहे. युवराजने टीममधील अनेक खेळाडूंचे कौतुक केले, मात्र Virat Kohli चे नाव त्याच्या पोस्टमध्ये नव्हते, ज्याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये दमदार कामगिरी केली होती. विराट कोहलीच्या खेळीची दखल का घेतली नाही? 🔥 पाकिस्तानविरुद्ध नाबाद 100 धावा🔥 ऑस्ट्रेलियाविरुद्ध 84 धावांची मोलाची खेळी🔥 स्पर्धेत संघासाठी महत्त्वाचे योगदान युवराजने पोस्टमध्ये रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या, फिरकीपटू आणि मोहम्मद शमी यांचे नाव घेतले, मात्र विराटचे नाव नव्हते, त्याला टॅगही केले नव्हते. युवराज सिंगची पोस्ट – काय लिहिले? “किती सुंदर सामना! भारताने पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली! कर्णधार रोहित शर्माने नेतृत्वगुणांचा उत्तम नमुना सादर केला. संघ संकटात असताना श्रेयस, गिल, राहुल, हार्दिक यांनी जबाबदारी घेतली. फिरकीपटूंनी शानदार प्रदर्शन केले. शमीनेही सातत्य ठेवले, मात्र न्यूझीलंडचे नशीब पुन्हा खराब ठरले.” या पोस्टनंतर चाहते अंदाज लावत आहेत की युवराज आणि विराटमध्ये काही वाद सुरू आहे का?
Tag: Yuvraj Singh
युवराज सिंगच्या वडिलांनी आमिरच्या चित्रपटाला दिली ‘वाहियात’ टीका, नेटकरी झाले चिडले!
युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी आमिर खानच्या एका चित्रपटाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांची ही मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. इतकंच नव्हे तर महिलांबद्दलही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. क्रिकेटर युवराज सिंगचे वडील, योगराज सिंग सध्या एक वादग्रस्त मुलाखत देऊन चर्चेत आले आहेत. युट्यूबर समधीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काही खूप बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. या मुलाखतीत योगराज सिंग यांनी अभिनेता आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटावर तिखट टीका केली. त्यांनी या चित्रपटाला ‘मूर्खपणा’ असं सांगितलं आणि त्यावर आपली नाराजी व्यक्त केली. योगराज सिंग यांनी मुलांना लहानपणापासून मोठं कसं करावं यावर देखील आपली दृष्टीकोन मांडला. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरू झाली असून, अनेक नेटकऱ्यांनी त्यावर आपले विचार व्यक्त केले आहेत. काहींनी त्यांना पाठिंबा दिला, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. क्रिकेटर युवराज सिंगचे वडील, योगराज सिंग यांनी एका मुलाखतीत काही वादग्रस्त विचार व्यक्त केले आहेत. त्यांचे वक्तव्य आता सोशल मीडियावर तुफान चर्चेत आले आहे. त्यांनी मुलांना त्यांच्या वडिलांच्या प्रभावाखाली घडविण्याचे महत्त्व सांगितले आणि यावर ते म्हणाले, “मुलगा तसाच होईल जसं बाप म्हणेल.” यावेळी त्यांना आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाविषयी प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्यांनी या चित्रपटाला “अत्यंत फालतू” असे सांगितले. योगराज सिंग यांच्या या टीकेमुळे चित्रपटाचे चाहते नाराज झाले आहेत. ‘तारे जमीन पर’ चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याचे प्रेक्षकांमध्ये विशेष कौतुक झाले होते. चित्रपटामध्ये ईशान अवस्थीच्या डिस्लेक्सिया समस्येवर आधारित कथा होती, ज्यावर आमिर खानने कला शिक्षकाची भूमिका साकारली होती. योगराज सिंग यांचे महिलांबद्दलचे वक्तव्य देखील वादग्रस्त ठरले. त्यांनी म्हटले, “महिलांना अधिकार दिले, तर त्या सर्वकाही उद्ध्वस्त करतील. घराचा प्रमुख पुरुष असला पाहिजे, पुरुषच घर चालवू शकतो.” या वाक्यामुळे त्यांच्या विचारांची कडक टीका केली जात आहे. योगराज सिंग यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण केला आहे, आणि त्यांच्या विचारांवर लोकांनी आपापले मत व्यक्त केले आहे.