Donald Trump Tariff :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण घोषणा केली गेली आहे. ट्रम्प यांनी आयात शुल्कावर एक मोठा निर्णय घेतला असून, भारतावर 26 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापाराच्या बाबतीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तसेच, चीनवर 34 टक्के आयात शुल्क लागू करणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. या निर्णयाचा फटका कृषी, रसायन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषधनिर्मिती, वैद्यकीय साहित्य निर्माण आणि यंत्रनिर्मिती क्षेत्रांवर होण्याची शक्यता आहे. भारतीय उद्योग क्षेत्रात या आयात शुल्काच्या वाढीमुळे काही आव्हाने निर्माण होऊ शकतात. अमेरिकेने 2 एप्रिल रोजी आयात शुल्काच्या बदलांबद्दल अंतिम निर्णय घेतला. भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील दौरेदरम्यान ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारत अमेरिकेवर 52 टक्के आयात शुल्क लावतो, आणि म्हणूनच अमेरिका भारतावर 26 टक्के आयात शुल्क लावणार आहे. आता जगभरातील देशांवर आणि खासकरून भारतावर या निर्णयाचे काय परिणाम होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tag: Trade Policy
PM Narendra Modi’s Challenge: Trump Tariff आणि भारताचे 87,47,44,00,000 रुपये नुकसान?
पंतप्रधान Narendra Modi आपल्या U.S. Visit दरम्यान Donald Trump यांच्याशी Bilateral Meeting करणार आहेत. या बैठकीत Trump Tariff संदर्भात चर्चा होणार असून India-U.S. Trade Relations साठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. 1. Trump Tariff चा Impact 2. Stock Market आणि Economic Impact 3. Modi-Trump बैठक आणि संभाव्य तोडगा 4. Global Trade आणि India पंतप्रधान Narendra Modi हे Donald Trump यांना India-U.S. Trade Balance सुधारण्यासाठी मनवू शकतील का? यावरच भारतीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य ठरणार आहे!