Donald Trump's Tariff
International News आंतरराष्ट्रीय

Donald Trump’s Tariff U-Turn: भारताला दिलासा, चीनवर कडक कारवाई

Reciprocal Tariff :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात घेतलेले काही आर्थिक निर्णय जागतिक व्यापारी धोरणांवर मोठा परिणाम करत आहेत. विशेषतः त्यांनी घेतलेला ‘Tariff’ (आयात शुल्क) संबंधी निर्णय आता चर्चेचा विषय ठरत आहे. चीनवर कडक पावले उचलताना, भारतासारख्या काही देशांना मात्र त्यांनी दिलासा दिला आहे. चीनवर आर्थिक घाव: Donald Trump यांनी चिनी वस्तूंवर थेट 125 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. याआधी हे शुल्क 104 टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. पण चीननेही प्रत्युत्तरात अमेरिकन वस्तूंवर 84 टक्के टॅरिफ लावले होते. त्यामुळे व्यापार युद्ध अधिकच तीव्र झालं होतं. ट्रम्प यांनी या नव्या निर्णयात स्पष्टपणे म्हटलं आहे की, “चीनने जागतिक बाजारपेठांचा सन्मान राखलेला नाही. त्यामुळे आम्ही आता 125% शुल्क आकारू. अमेरिका आणि इतर देशांचे शोषण यापुढे खपवून घेतले जाणार नाही.” हा निर्णय आतापर्यंतचा सर्वात आक्रमक निर्णय मानला जातोय. भारतासह 75 देशांना दिलासा: ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नव्या टॅरिफ धोरणात भारतासह 75 देशांना 90 दिवसांची सवलत देण्यात आली आहे. या कालावधीत केवळ 10% शुल्क आकारलं जाणार आहे. ट्रेजरी सचिव बेसेंट यांनी स्पष्ट केलं की, “ज्या देशांनी अमेरिकेविरोधात कोणतीही टॅरिफ प्रत्युत्तरात्मक कारवाई केली नाही, त्यांच्यासाठी ही सवलत म्हणजे इनाम आहे.” ‘रेसिप्रोकल टॅरिफ’मध्ये बदल: ‘Reciprocal Tariff’ म्हणजेच परस्पर कररचना, या अंतर्गत ट्रम्प यांनी 90 दिवसांच्या कालावधीत ही सवलत लागू केली आहे. Truth Social या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना त्यांनी लिहिलं, “मी 90 दिवसांसाठी PAUSE घेतो आहे. या काळात मित्र देशांना केवळ 10% शुल्क लावलं जाईल.” जागतिक व्यापारी तणाव आणि ट्रम्प यांचा निर्णय: सध्या संपूर्ण जगात व्यापारी तणावाचे वातावरण आहे. अनेक मोठ्या देशांनी परस्पर आयात-निर्यात शुल्क वाढवले आहेत. जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर ही टॅरिफ पॉलिसी महत्त्वाची ठरत आहे. ट्रम्प यांच्या यु-टर्नमागे जागतिक दबाव आणि बाजारातील प्रतिक्रिया यांचा मोठा वाटा असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. चीनसाठी ‘शिक्षा’, भारतासाठी ‘इनाम’: एकीकडे चीनवर 125% आयात शुल्क लावून ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे, तर दुसरीकडे भारत, मॅक्सिको, कॅनडा यासारख्या देशांना सवलत देऊन मैत्रीपूर्ण संदेशही दिला आहे. यामुळे अमेरिकेच्या व्यापारी धोरणात दोन टोकांचा स्पष्ट फरक दिसून येतो. ट्रेड वॉरचा परिणाम कोणावर होणार? विश्लेषकांच्या मते, अमेरिकेचा हा टॅरिफ निर्णय चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करू शकतो. चीनच्या अनेक निर्यातधारित उद्योगांवर याचा परिणाम होणार असून, भारतासारख्या देशांना मात्र व्यापार विस्ताराची संधी मिळू शकते. ही संधी भारतीय कंपन्यांनी कशी वापरते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ३ दिवसांमध्ये Gold Rates कमी झाले? Donald Trump ते Mine सोनं कमी होण्याच्या चर्चांमध्ये किती सत्य?

Donald Trump's big decision:
आजच्या बातम्या

Donald Trump News: जगभरातील देशांना फटका भारतावर 26 टक्के आयात..

Donald Trump Tariff :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण घोषणा केली गेली आहे. ट्रम्प यांनी आयात शुल्कावर एक मोठा निर्णय घेतला असून, भारतावर 26 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापाराच्या बाबतीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तसेच, चीनवर 34 टक्के आयात शुल्क लागू करणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. या निर्णयाचा फटका कृषी, रसायन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषधनिर्मिती, वैद्यकीय साहित्य निर्माण आणि यंत्रनिर्मिती क्षेत्रांवर होण्याची शक्यता आहे. भारतीय उद्योग क्षेत्रात या आयात शुल्काच्या वाढीमुळे काही आव्हाने निर्माण होऊ शकतात. अमेरिकेने 2 एप्रिल रोजी आयात शुल्काच्या बदलांबद्दल अंतिम निर्णय घेतला. भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील दौरेदरम्यान ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारत अमेरिकेवर 52 टक्के आयात शुल्क लावतो, आणि म्हणूनच अमेरिका भारतावर 26 टक्के आयात शुल्क लावणार आहे. आता जगभरातील देशांवर आणि खासकरून भारतावर या निर्णयाचे काय परिणाम होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.