राजकीय वर्तुळात NCP (Sharad Pawar faction) leader Jitendra Awhad आणि BJP MLA Suresh Dhas यांच्यात जोरदार political clash सुरु आहे. Maratha Reservation, Manoj Jarange, Santosh Deshmukh case, Somnath Suryawanshi death आणि Akshay Shinde encounter या मुद्द्यांवरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. Jitendra Awhad यांचे गंभीर आरोप Jitendra Awhad यांनी Suresh Dhas यांच्यावर थेट आरोप करत म्हटलं, “तुम्हाला मराठा समाजात फूट पाडण्यासाठी आणि Manoj Jarange यांना कमी करण्यासाठी पाठवले आहे. लोकांना हे समजत नाही का?” तसेच, “तुम्ही OBC आणि मराठा समाजाला फक्त घाबरवण्याचे काम केले,” असंही ते म्हणाले. Suresh Dhas यांचे प्रत्युत्तर Suresh Dhas यांनी Jitendra Awhad यांना “तुम्ही मोर्चा काढून दाखवा,” असं आव्हान दिलं होतं. त्यावर Awhad यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं, “तुम्हाला मोर्चेबद्दल इतकं प्रेम असेल तर आतापर्यंत हजारो मोर्चे निघाले आहेत. आम्हाला त्याची गरज नाही.” Akshay Shinde आणि Somnath Suryawanshi प्रकरणावर वाद Political War Intensifies! हा वाद आता मोठ्या political controversy मध्ये बदलला आहे. BJP vs NCP संघर्ष, Maratha vs OBC Reservation issue आणि Police Actions यामुळे महाराष्ट्राच्या political landscape मध्ये तणाव वाढत आहे.
Tag: Suresh Dhas
वाल्मिक कराड सीआयडी कोठडीत आजारी; हत्येतील तपास आणि ग्रामपंचायतींचे आंदोलन
बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दरी गहरी होत आहे. एक महिना उलटला तरी आरोपींची अटक सुरू आहे, आणि तपासाची चक्रे गुंतागुंतीची होत आहेत. त्याच दरम्यान, वाल्मिक कराड सीआयडी कोठडीत असताना अचानक आजारी पडला आहे, आणि त्याच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट्स आली आहेत. यावर आरोग्यकेंद्रीक तपासही सुरू आहे. दुसरीकडे, संतोष देशमुखच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभर ग्रामपंचायतींनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. वाल्मिक कराडची तब्येत व संकटं: वाल्मिक कराड, जो हत्येतील प्रमुख आरोपींपैकी एक आहे, सध्या बीड जिल्ह्याच्या सीआयडी कोठडीत आहे. त्याच्या डोळ्याला संसर्ग झाल्यामुळे त्याला वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत, त्याला डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप दिले आहेत. जर व्हॉईस सॅम्पल जुळवण्यात आले, तर यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर तपास सुरू असताना, वाल्मिकच्या सध्याच्या स्थितीने तपास प्रक्रियेला नवीन वळण दिलं आहे. संतोष देशमुख हत्येचा तपास आणि अटक: संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सुरू असून, या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहेत, आणि स्थानिक गुन्हे शाखा, CID आणि SIT मिळून तपास करत आहेत. सात आरोपींमध्ये जयराम माणिक चाटे, महेश सखाराम केदार, प्रतिक घुले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनावणे यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींचं काम बंद आंदोलन: संतोष देशमुखच्या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत राज्यभर ग्रामपंचायतींनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. रिपाई आठवले गटाने कंकालेश्वर मंदिरात साकडे घालून हत्येच्या प्रकरणाचा त्वरित स्पष्टीकरण मागितला आहे. जर लवकरच स्पष्टीकरण दिलं नाही, तर आंदोलन तीव्र होईल अशी चेतावणी दिली आहे. आज अनेक ग्रामपंचायतींमध्ये कामकाज बंद आहे आणि त्यांमध्ये कुलूप दिसत आहेत. Conclusion: संतोष देशमुख हत्येची प्रकरण जितकी गुंतागुंतीची होत आहे, तितकीच वाल्मिक कराडच्या प्रकृतीच्या अपडेट्स तपासाच्या दिशेने नवा वळण घेऊ शकतात. यामध्ये आणखी कोणते नवे वळण येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन कसे पुढे सरकेल आणि आरोपींच्या भविष्यातील कायदेशीर कारवाई कशी होईल, हे देखील भविष्यात स्पष्ट होईल.
सुरेश धस यांची अजित पवारांशी चर्चा: राजकीय घडामोडींना उधाण
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधातील मागणी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर, सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा राजीनामा मागितला. या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच, धस यांनी अजित पवार यांची भेट घेणे विशेष लक्षवेधी ठरले आहे. पतसंस्थांवरील घोटाळ्यांवर चर्चा माध्यमांशी संवाद साधताना, धस यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या या भेटीचा मुख्य उद्देश बीडमधील पतसंस्थांमधून झालेल्या आर्थिक फसवणुकीवर तोडगा काढणे हा होता. मराठवाड्यातील 16 लाख गुंतवणूकदारांचे पैसे अडकले असून, 26 जणांनी या प्रकरणामुळे आत्महत्या केल्या आहेत. धनंजय मुंडेंचा सहभाग? पत्रकारांनी धनंजय मुंडे यांच्या संभाव्य सहभागाबद्दल विचारले असता, धस यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. राजकीय चर्चा आणि महत्त्वाचे संकेत धस यांच्या या भेटीला महत्त्व असण्याचे कारण म्हणजे त्यांनी याआधी धनंजय मुंडेंविरोधात राज्यपालांची भेट घेतली होती. त्याचवेळी धनंजय मुंडे यांनीही मंत्रालयात अजित पवार यांच्याशी तासभर चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर, धस आणि पवार यांच्यातील भेटीचे परिणाम काय असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सुरेश धस यांनी उलगडले बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे रहस्य
आजवर अनेकांनी बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केले, पण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम उलगडून एक धक्कादायक कहाणी सांगितली. सुरुवातीला सुरेश धस यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे यांच्या इन्व्हॉल्व्हमेंटबद्दल चर्चा केली. “यांचा मुख्य आका कोण?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले की आम्हीही याचा शोध घेत आहोत. धस यांनी सुदर्शन घुलेवर आरोप करत त्याच्या आर्थिक स्त्रोतांबद्दल शंका उपस्थित केली. त्यांनी सांगितले की या प्रकरणातील आरोपींनी एका मोठ्या कटाची योजना आखली होती. सरपंचांच्या हत्येमागची मन हेलावून टाकणारी कहाणी सरपंचांच्या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की पिस्तूल असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून ती काढून घेण्यात यावी. सरपंच संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे आणि सुरेश धस यांचे भावनिक भाषण ऐकल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Beed Santosh Deshmukh हत्याकांड प्रकरण – Suresh Dhas
आजवर अनेकांनी बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील घटनाक्रम सांगितला, त्याबद्दल भाष्य केलं पण सुरेश धस यांनी बीड हत्या प्रकरणाचा अतिशय तपशीलवार घटनाक्रम सांगून या पूर्ण घटनेची सर्वांना थक्क करून सोडणारी कहाणी सांगितली. त्यामुळे नक्की सुरेश धस त्यांच्या भाषणात काय म्हणालेत तेच पाहुयात. सुरुवातीला सुरेश धस यांनी बीड प्रकरणातील अगदी सुरवातीपासूनचा घटनाक्रम सांगत, विष्णू चाटे याच्या या प्रकरणातील इन्व्हॉल्व्हमेंट बद्दल भाष्य केलं. तर पुढे यांचा कोण आका आहे? असा सवाल देखील उपस्थित केला. तर यावर विरोधकांना उत्तर देत तुमच्याप्रमाणे आम्ही देखील या आकाच्या शोधात आहोत असं सुरेश धस म्हणाले. प्रकरणातील पुढील घटनाक्रम सांगताना सुरेश धस यांनी सुदर्शन घुले नामक इसमावर टीका केली व ज्याचं घर चार-पाच पत्र्याचं आहे तो स्कॉर्पिओ मध्ये कसा काय फिरू शकतो? त्याला स्कॉर्पिओ कोणी दिली हे शोधणं महत्त्वाचं आहे. असं म्हणत प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाबाबत पुढे बोलत असताना मी या सर्व प्रकरणाची माहिती घेतली आहे आणि त्यानुसार या सगळ्यांनी एक प्लॅन केला असं म्हणत सुरेश धस यांनी आरोपींचा काय प्लॅन होता ते सांगितलं. यापुढे सुरेश धस यांनी या प्रकरणातील सर्वांना हादरवून टाकणारी कहानी सांगितली. तर बीड जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांकडे पिस्तूल आहेत, त्या त्या लोकांचे पिस्तूल आपण काढून घ्यावे यासाठी अध्यक्षांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती केली. सुरेश धस यांनी त्यांच्या भाषणात या प्रकरणावरून ग्रामस्थांचा संताप का झाला, या मागील कारण देखील स्पष्ट केला आहे. अशाप्रकारे सुरेश धस यांनी बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मनाला अतिशय वेदना देणारी कहानी सांगत, भावनिक पद्धतीने भाषण दिले. तर यावर तुमचे मत काय? कमेंट करून नक्की सांगा
Beed प्रकरणाच्या आधीपासून Suresh Dhas विरुद्ध Pankaja व Dhananjay Munde असा संघर्ष कसा चालू झाला?
सध्या महाराष्ट्रात लोक सर्वात जास्त जर कोणत्या बातमीची वाट पाहत असतील तर ती म्हणजे वाल्मिक कराड याच्या अटकेची आणि असच काहीस सध्या झालय. अखेर मस्साजोग प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडला अटक केली आहे. दरम्यान वाल्मिक कराड याच्या अटके मुळे आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढे काय होणार? धनंजय मुंडेंवर या अटकेचा काय परिणाम होणार ते जाणून घेऊयात वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आल्याने आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळणार असल्याचं बोललं जात असून, या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीड येथील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड कडे एक मुख्य आरोपी आणि सूत्रधार म्हणून बघितलं जात होत, त्यामुळे आता पोलीस चौकशीमध्ये वाल्मिक कराड कोणते नवे खुलासे करणार, वाल्मिक कराडच्या स्टेटमेंट मध्ये कोणती नवी नावे समोर येणार का या कडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहील आहे. दरम्यान वाल्मिक कराड आता पोलिसांच्या ताब्यात असल्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेग मिळून लवकरच या हत्या प्रकरणातील खरा आरोपी कोण आहे? संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली? त्यांच्या हत्ये मागील नेमकं काय कारण होत? हे समोर येऊन संतोष देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडचा अँगल समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे मानले जात असल्याने आरोपी वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंची साथ आहे, धनंजय मुंडेंचा वरदहस्त असल्याने वाल्मिक कराड मोकाट आहे, त्याला अजूनही अटक झालेली नाही असे आरोप देखील धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आले होते, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजकीय अस्तित्वाव देखील धोक्यात आलं होतं, म्हणूनच याचा धनंजय मुंडेंच्या राजकारणावर काय परिणाम होणार तेही पाहुयात. बीड येथील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड च नाव जोडलं गेल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, ज्यात महायुतीमधील नेत्यांचा देखील समावेश होता. तसेच “आकाचा आका” म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड वर वरदहस्त असल्याचं देखील सूचित केलं होतं. तर माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन आरोपींना शिक्षा होई पर्यंत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आता या सगळ्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केली जाणारी मागणी बंद होईल आणि धनंजय मुंडे यांना त्यांचं मंत्रिपद कायम ठेवता येईल असं बोललं जातंय. दरम्यान या प्रकरणावरून मराठा विरुद्ध ओबिसि वाद पुन्हा एकदा उफाळला होता. आणि या वादाच्या केंद्रस्थानी धनंजय मुंडे होते. मात्र आता आरोपी वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात असल्याने बीड मध्ये चालू झालेला हा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष कमी होईल व ओबिसि नेते असणाऱ्या धनंजय मुंडे यांना याची कमी झळ बसण्याची शक्यता आहे. बीड येथील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या प्रमाणे धनंजय मुंडे यांना सर्वपक्षीय नेत्यांनी घेरलं होत, त्याचप्रमाणे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा लावून धरत महायुतीसरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील विरोधकांकडून घणाघाती टीका करण्यात येत होती. तर महायुती सरकारच्या कार्य क्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. पण आता अखेर वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात असल्याने महायुतीसरकार वर होणारी हि चिखलफेक कमी होणार असल्याचं दिसतंय. तर तुम्हाला काय वाटतं, खरंच वाल्मिक कराड च्या अटकेचा धनंजय मुंडे यांना फायदा होणार का ते कंमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला काय वाटतं, वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेल्याने धनंजय मुंडे यांना फायदा होणार का ते कंमेंट करून नक्की सांगा