भारतीय वंशाच्या अंतराळवीर Sunita Williams ने अंतराळात नऊ महिने (287 दिवस) घालवले. तिच्या या अविस्मरणीय प्रवासामुळे तिच्या पगाराबद्दल आणि ओव्हरटाईमबद्दल चर्चा सुरू झाली आहे. पण, सुनीता विल्यम्सला अंतराळ मिशनसाठी किती पगार मिळत होता आणि ओव्हरटाईम किती मिळाले? चला, जाणून घेऊयात. नासाच्या वेतन नियमांनुसार, सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी बुच विलोमर हे GS-15 रँकचे कर्मचारी आहेत. हे रँक अमेरिकन सरकारच्या जनरल पे स्केलपेक्षा जास्त आहे. त्यांचा वार्षिक पगार $125,133 ते $162,672 (₹1.08 कोटी ते ₹1.41 कोटी) दरम्यान असतो. 287 दिवसांच्या मिशनसाठी त्यांचा अंदाजे पगार $93,850 ते $122,004 (₹81 लाख ते ₹1.05 कोटी) होता. आता ओव्हरटाईमबद्दल बोलायचं तर, NASA अंतराळवीरांना कोणताही ओव्हरटाईम देत नाही. त्यांना फक्त ठराविक दैनंदिन भत्ता मिळतो. सुनीता विल्यम्स आणि बुच विलोमर यांना त्यांच्या 287 दिवसांच्या मिशनसाठी $1,148 (₹95,400) चा अतिरिक्त भत्ता मिळाला. अंतराळवीरांना प्रशिक्षणापासून ते मिशनपर्यंत अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागतो. 9 महिने मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये राहणे, अंतराळ स्थानकावर संशोधन करणे आणि शारीरिक-मानसिक आव्हानांना सामोरे जाणे सोपे नाही. त्यामुळे त्यांना दिला जाणारा पगार आणि भत्ता त्यांच्या मेहनतीला पुरेसा आहे.