आजकाल शाकाहाराची निवड करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की Vitamin B-12 या जीवनसत्वाची कमतरता शाकाहारी लोकांमध्ये अधिक प्रमाणात आढळते? व्हिटॅमिन B-12 आणि शरीरातील महत्त्व हे जीवनसत्व शरीरातील पेशी आणि रक्ताच्या कार्यांसाठी अत्यावश्यक आहे. याची कमतरता असल्यास अशक्तपणा, थकवा, केसगळती, भूक मंदावणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. शाकाहारी आहार आणि B-12 ची कमतरता व्हिटॅमिन B-12 प्राणी-आधारित पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे शाकाहारी लोकांमध्ये याची कमतरता जाणवते. काही शाकाहारी पर्याय जसे की संपूर्ण धान्य, सोया दूध आणि हिरव्या पालेभाज्या यामध्ये थोड्या प्रमाणात हे जीवनसत्व असले तरीही ते पुरेसे ठरत नाही. व्हिटॅमिन B-12 ची कमतरता कशी भरून काढावी? शाकाहारी लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने B-12 सप्लिमेंट्स, इंजेक्शन्स किंवा पोषणपूरक गोळ्या घेऊ शकतात. योग्य आहार आणि पूरक पोषणाद्वारे यावर नियंत्रण ठेवता येते. (सूचना: ही माहिती फक्त वाचकांसाठी आहे. कोणताही आरोग्य निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)