Sara Tendulkar
Cricket Sports

Sara Tendulkar झाली मुंबई फ्रँचायझीची मालकीण: ई-क्रिकेटमध्ये नवा अध्याय

सचिन तेंडुलकरच्या मुलगी Sara Tendulkar ने क्रिकेटच्या क्षेत्रात एक मोठा पाऊल टाकले आहे. आयपीएल 2025 च्या हंगामात सारा तेंडुलकरने मुंबई फ्रँचायझीची मालकी घेतली आहे. ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग (GEPL)मध्ये मुंबई फ्रँचायझीची मालकी मिळवणे हे सारा साठी एक मोठं स्वप्न सिद्ध झालं आहे. GEPL ही स्पर्धा वास्तविक क्रिकेटवर आधारित आहे आणि हळूहळू मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होईल अशी आशा आहे. GEPL मध्ये मुंबई फ्रँचायझीची मालकी घेतल्यानंतर सारा तेंडुलकरने सांगितलं की, “क्रिकेट हा एक महत्त्वाचा भाग आहे. ई-स्पोर्ट्समध्ये क्रिकेटचा आनंद घेणं रोमांचक असणार आहे.” या लीगची लोकप्रियता झपाट्याने वाढली असून, आज पर्यंत 30 कोटींपेक्षा जास्त लोकांनी ते डाउनलोड केले आहे. आता 910,000 नोंदणी झाल्या आहेत आणि लीगने मल्टीप्लॅटफॉर्मवरील 70 दशलक्षांहून अधिक पोहोच गाठली आहे. सारा तेंडुलकरच्या या निर्णयाने त्याच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाला एक नवीन दिशा मिळाल्याचं दिसतं.