अभिनेत्री Aishwarya Rai आणि अभिषेक बच्चन यांचे नाते काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहेत. मात्र, या चर्चांमध्ये एक गोष्ट आठवण्यासारखी आहे. एक काळ असा होता की, ऐश्वर्या रायला एक मोठा उद्योगपती लग्नासाठी पसंती होता – तो म्हणजे सबीर भाटिया. कोण आहेत सबीर भाटिया? सबीर भाटिया हे एक मोठे उद्योगपती आहेत. त्यांनी 1996 मध्ये आपल्या मित्र जॅक स्मिथ सोबत हॉटमेलची स्थापना केली. 1998 मध्ये त्यांनी हॉटमेल ही कंपनी 3300 कोटींना बिल गेट्सला विकली. आज ती कंपनी आऊटलूक म्हणून ओळखली जाते. सध्या ते एआय आणि क्लीन फैनेटिक्समध्ये काम करत आहेत. ऐश्वर्या राय आणि सबीर भाटियाचे कनेक्शन सबीर भाटिया फक्त एक उद्योगपतीच नाही, तर बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध झाले होते. अनेक रिपोर्ट्समधून हे सांगितले जाते की, सबीर भाटियाला ऐश्वर्या रायशी लग्न करायचं होतं. त्यांनी ताल चित्रपट पाहिल्यानंतर ऐश्वर्याचे तोंडभरून कौतुक केले आणि एका मुलाखतीत तो स्वतः सांगत होता की, “माझ्या इच्छा आहेत की मी ऐश्वर्याशी लग्न करू.” सलमान खान आणि सबीरची भेट 2001 च्या डिसेंबरमध्ये, सबीर भाटिया आणि सलमान खान यांची एका पार्टीमध्ये भेट झाली होती. त्या वेळी ऐश्वर्या राय आणि सबीर भाटिया यांचं प्रेम संबंध जरा चर्चेत आले होते. पार्टीमध्ये एका संभाषणादरम्यान, सलमानने सबीरला विचारले, “मग, तू तो माणूस आहेस ज्याला ऐश्वर्या रायशी लग्न करायचं आहे का?” एक वादग्रस्त घटनेसुद्धा पार्टीतच एका वेळी, सलमानने त्याच्या सिगारेटने सबीरच्या हातावर चटका लावला. त्या वेळी सलमानने क्षमाप्रार्थी होऊन असे सांगितले, “अरेरे, शेवटी ‘ऐश’ तुमच्या हातात आली.” इतर बॉलिवूड कनेक्शन ऐश्वर्याशिवाय, अमिषा पटेल आणि सुष्मिता सेन यांचीही नावे सबीर भाटियाशी जोडली जात होती. मात्र, 9 मार्च 2008 रोजी, सबीरने त्याच्या बालपणीच्या मैत्रिणी तान्या शर्माशी लग्न केले, पण काही वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला.