Pakistan Train Hijack:
International News आजच्या बातम्या

Pakistan Train Hijack : बलुचिस्तानात पाक सैन्याला गुडघे टेकायला भाग पाडणारा तो डॉक्टरचा मुलगा कोण?

Balochistan मध्ये Pakistan च्या सैन्याला मोठं आव्हान देणाऱ्या बशीर जेबची चर्चा सध्या जगभर होत आहे. बलोच लिबरेशन आर्मीचा प्रमुख म्हणून ओळखला जाणारा हा व्यक्ती कसा निर्माण झाला आणि त्याने पाक सैन्याला गुडघे टेकायला कसं भाग पाडलं, याची सविस्तर माहिती जाणून घ्या. Bashir Zeb : बलूच लिबरेशन आर्मीचा प्रमुख बलूचिस्तानमधील स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बशीर जेबने 2018 मध्ये BLA ची कमान हाती घेतली. 2000 साली स्थापन झालेल्या बलूच लिबरेशन आर्मीचा तो कमांडर इन चीफ आहे. पाकिस्तानमधील वरिष्ठ पत्रकार किया बलोच यांच्या मते, जेबचं वय साधारणतः 40 वर्षांच्या आसपास आहे. तो एका मध्यमवर्गीय डॉक्टरच्या कुटुंबातून आला असून, बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी BLA मध्ये सहभागी झाला. पाकिस्तान सरकारची सत्ता डळमळीत? बलूचिस्तानमध्ये पाकिस्तान सरकारचं नियंत्रण दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याचं बोललं जात आहे. बशीर जेबच्या नेतृत्वाखालील BLA ने अनेक मोठे हल्ले केले असून, पाकिस्तान सैन्याला गुडघे टेकायला भाग पाडलं आहे. पाकिस्तानच्या आतल्या राजकारणातही या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.