Oral Cancer
Health आरोग्य

Oral Cancer: मौखिक कर्करोगाचा वाढतोय धोका, तंबाखूचे सेवन करणाऱ्यांनी आवर्जून करावी तोंडाची तपासणी

मौखिक कर्करोग (Oral Cancer) च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वात मोठा कारण म्हणजे तंबाखू, गुटखा, सिगारेट, खैनी आणि इतर तंबाखुजन्य पदार्थांचा वाढता वापर. आपल्या देशात तंबाखूचे उत्पादन आणि सेवन जगभरात सर्वात जास्त आहे, आणि त्यामुळे मौखिक कर्करोगाच्या रुग्णांची संख्या चिंताजनकपणे वाढत आहे. तज्ज्ञांचा सल्ला: तंबाखू सेवन करणाऱ्यांनी नियमित तोंडाच्या तपासणीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तंबाखू, गुटखा, सिगारेट किंवा खैनी सेवन करणाऱ्यांनी दर महिना तोंडाची तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्या तोंडात होणारे बदल लवकर ओळखता येतात, आणि कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांची वेळेत तपासणी होऊ शकते. मौखिक कर्करोगाची लक्षणे कशी ओळखाल? मौखिक कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये पांढरे किंवा लालसर फोड, तोंड उघडण्यात अडचण, जीभ बाहेर काढताना त्रास, आवाजातील बदल यांचा समावेश होतो. जर तुम्हाला या लक्षणांपैकी काही दिसत असेल, तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. मौखिक स्वच्छतेसाठी टिप्स: चांगल्या मौखिक आरोग्यासाठी सुदृढ जीवनशैली महत्त्वाची: सहाजिकपणे, तुमच्या तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी सुदृढ जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, ॲन्‍टीऑक्‍सिडंट्स, प्रोटीन, आणि फायबर्सयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे ओळखली तर परिस्थिती नियंत्रणात आणता येईल. तोंडाच्या आरोग्याची नियमित तपासणी करा आणि आपल्या शरीरातील बदलाकडे लक्ष द्या. वेळेवर निदान तुमचे जीवन वाचवू शकते.

Updates

शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लावला शोध… फक्त १५ मिनिटात होणार Mouth Cancer च निदान!

वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवणारा शोध नागपूरच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांने मिळून लावला आहे. मुख कर्करोगाचे म्हणजेच तोंडाच्या Cancer चे निदान 15 मिनिटांत करण्याचा शोध या संशोधकांनी लावला असून या संशोधनामुळे वेळीच मुख कर्करोगाचे निदान करणे शक्य होणार आहे. जेणेकरून रुग्णांना योग्यवेळी उपचार घेऊन या दुर्धर आजारापासून मुक्तता मिळवता येणार आहे. कॅन्सरच्या निदान प्रक्रियेतील हे एक अत्यंत क्रांतिकारी आणि महत्वपूर्ण संशोधन म्हणून समोर आलं आहे. म्हणूनच नेमकं हे संशोधन काय आहे? याचा कॅन्सर patients ना कसा फायदा होणार आहे? मागील काही वर्षांमध्ये कॅन्सर अतिशय दुर्धर असा आजार बनला आहे. खासकरून तोंडाचा कॅन्सर . मुळात कॅन्सर ची लक्षणे उशिरा दिसून येत असल्याने निदानाला देखील उशिर होतो. परिणामी रुग्णांना उपचार सुद्धा उशिराने सुरु होतात, त्यामुळे कित्येकदा वेळ व पैसे खर्चून देखील उशिरा निदान झाल्याने रुग्णांचे प्राण वाचवता येत नाहीत. अश्या परिस्थितीत योग्यवेळी निदान हाच कॅन्सरपासून मुक्तिचा मार्ग आहे, असं म्हणावं लागत. जिथे नागपूरच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांने मिळून लावलेला शोध महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. या शोधामुळे आता कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष न पाहता केवळ 15 मिनिटांत त्याला भविष्यात तोंडाचा कॅन्सर होणार का नाही, याचे खात्रीलायक निदान करता येणार आहे. कॅन्सर चे निदान करणारे हे तंत्रज्ञान आपल्या भारतात विकसित करण्यात आले असून हे जगातील पहिले तंत्रज्ञान आहे. यामुळे आता कॅन्सर होण्याच्या आधीच त्याचे निदान शक्य झाले आहे. नागपूरच्या एर्लीसाइन या बायोटेक स्टार्टअपने तोंडाच्या कॅन्सरच्या सुरुवातीची लक्षणे लवकर ओळखण्यासाठी भारतातील पहिली लाळ-आधारित चाचणी विकसित केली आहे. या तंत्रज्ञानात MMP2 आणि MMP9 हे बायोमार्कर्स वापरले जातात, जे कॅन्सरच्या निदानासाठी एक सोपे आणि वेदनारहित तंत्रज्ञान प्रदान करतात. हे तंत्रज्ञान अत्यंत अचूक असल्याचा दावा केला जात आहे. तर हा महत्त्वाचा शोध नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्राध्यापक देवव्रत बेगडे आणि विद्यार्थी शुभेंद्रसिंग ठाकूर यांनी लावला आहे. त्यांच्या या संशोधनाला अमेरिकन आणि भारतीय पेटंट मिळाले असून, हे तंत्रज्ञान कॅन्सर च्या लवकर निदानासाठी मोठी क्रांती ठरू शकते, असं सांगण्यात येतय. “आमची चाचणी विशिष्ट लाळेच्या बायोमार्कर्स, MMP2 आणि MMP9 ला लक्ष्य करते. ते Mouth कॅन्सरच्या प्रगतीचे अत्यंत सूचक आहे. या नॉन-इनवेसिव्ह आणि परवडणाऱ्या चाचणीचा उद्देश लवकर निदान व लक्षणीय सुधारणा करणे हा आहे, भारतातील Mouth कॅन्सरच्या रुग्णांची संख्या कमी करणे आणि रुग्णांचा जीव वाचवणे हे आमचे उद्देश्य असून या तंत्रज्ञानामध्ये Mouth कॅन्सरच्या निदानात क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे, याचा आम्हाला विश्वास आहे, असं या शोधाचे संशोधन करणारे शुभेंद्रसिंग ठाकूर म्हणाले आहेत. तर हि माहिती तुम्हाला कशी वाटली….