Karnataka Budget 2025:
Budget 2025 आजच्या बातम्या

Karnataka Budget 2025: मल्टिप्लेक्समधील तिकीट दर ₹200 मर्यादित, कन्नड सिनेसृष्टीसाठी नवीन OTT प्लॅटफॉर्म!

Karnataka Budget 2025 : कर्नाटकच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज कर्नाटक विधानसभेत आपला 16 वा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये कल्याणकारी योजना आणि औद्योगिक विकासाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कर्नाटक सरकारचा एकूण अंदाजपत्रक आकार 2025-26 साठी तब्बल ₹4 लाख कोटींहून अधिक असण्याची शक्यता आहे, जो मागील वर्षाच्या ₹3.71 लाख कोटींच्या तुलनेत अधिक आहे. बजेट 2025 मधील महत्त्वाचे निर्णय: ✅ मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा तिकिटांसाठी ₹200 ची मर्यादा!राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट तिकिटांच्या किमतींवर ₹200 ची कमाल मर्यादा लागू करण्यात आली आहे. हा निर्णय प्रेक्षकांसाठी आनंददायक ठरणार आहे. ✅ कन्नड चित्रपटांसाठी नवीन OTT प्लॅटफॉर्मकर्नाटक सरकार कन्नड चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी नवीन OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे, ज्यामुळे स्थानिक कलाकारांना आणि निर्मात्यांना नवीन व्यासपीठ मिळेल. ✅ राज्य आमदारांचे वेतन वाढवलेमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीने राज्य आमदारांचे वेतन वाढवण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ✅ बंगळुरू पॅलेस बिल मंजूरकर्नाटक विधानसभेने बंगळुरू पॅलेस बिल मंजूर केले आहे. या विधेयकामुळे राज्य सरकारला रस्ते रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या हस्तांतरणासंदर्भात नवीन अधिकार मिळाले आहेत. कर्नाटक बजेट 2025 मध्ये कल्याणकारी योजनांवर अधिक भर दिला जाणार आहे, तर औद्योगिक विकासासाठी नवे धोरण राबवले जाणार आहे. Infosys च्या नवीन Work Policy मुळे Wrok From Home कर्मचाऱ्यांना आता Office ला यावं लागणार!