Chhatrapati Sambhaji Nagar Crime: येथे घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. 19 वर्षीय नराधमाने आपल्या 36 वर्षीय नातेवाईक महिलेकडे विकृत मागणी केली. तिने नकार दिल्याने क्रूरतेची सर्व मर्यादा ओलांडत तिच्यावर कटरने सपासप वार केले. या भयानक हल्ल्यात महिलेला तब्बल 280 टाके घालावे लागले असून, तिच्या उपचारांसाठी 22 हजार रुपयांचा शस्त्रक्रियेसाठी लागणारा धागा वापरण्यात आला. पीडितेची हृदयद्रावक व्यथा – ‘गोधडीवानी माझं अंग शिवावं लागलं’ पीडित महिलेने तिच्या सहन कराव्या लागणाऱ्या वेदनांबद्दल मोकळेपणाने बोलताना सांगितले की, “माझ्यावर तो एवढे वार करत होता की, डॉक्टरला अक्षरशः गोधडीसारखं माझं अंग शिवावं लागलं. इतकी जखमी झाले की शरीरात एकही अवयव शाबूत राहिला नाही. प्रत्येक जखमेवर टाके पडले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तीव्र वेदना होत आहेत.” रडायचीही भीती वाटते!तिच्या मते, “इतक्या खोल जखमा झाल्या आहेत की, जर डोळ्यात पाणी आलं, तर ते अश्रू जखमेवर पडून आग उठते. वेदना सहन होत नाहीत, पण रडायलाही भीती वाटते.” नराधमाची निर्दयी वृत्ती – गावात उघडपणे फिरत होता! अभिषेक नवपुते या नराधमाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. तिच्या नकारानंतर त्याने तिच्यावर धारदार कटरने सपासप वार केले. एवढ्या भयंकर कृत्याचा त्याला अजिबात पश्चात्ताप नव्हता. तो गावात अगदी सामान्य माणसासारखा वावरत होता. 280 टाके, सव्वादोन फूट लांब जखम! पीडितेच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती ही महिला सध्या खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या उपचारासाठी मोठा खर्च येत असून, तिच्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे नाहीत. तिच्या दोन लहान मुलांचे भवितव्यही धोक्यात आले आहे. नेमकं काय घडलं? महिला शेतात काम करत असताना आरोपीने तिला फोन करून “एकतर तू माझ्यासोबत झोप, नाहीतर जावेला माझ्यासोबत जुळवून दे!” अशी घृणास्पद मागणी केली. तिने फोन कट केल्यानंतर, संध्याकाळी ती एकटी जात असताना त्याने पाठीमागून येऊन तिचे केस धरून तिचे डोके दगडावर आपटले. त्यानंतर, पोलीस कारवाई आणि आरोपीला शिक्षा मिळणार का? या घटनेनंतर संतप्त जनतेने आरोपीस कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असली, तरी अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे समाजातून आवाज उठत आहे.छत्रपती संभाजीनगर : नराधमाची अमानवी क्रूरता – पीडितेच्या वेदनांनी काळजाचा थरकाप! छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. 19 वर्षीय नराधमाने आपल्या 36 वर्षीय नातेवाईक महिलेकडे विकृत मागणी केली. तिने नकार दिल्याने क्रूरतेची सर्व मर्यादा ओलांडत तिच्यावर कटरने सपासप वार केले. या भयानक हल्ल्यात महिलेला तब्बल 280 टाके घालावे लागले असून, तिच्या उपचारांसाठी 22 हजार रुपयांचा शस्त्रक्रियेसाठी लागणारा धागा वापरण्यात आला. पीडितेची हृदयद्रावक व्यथा – ‘गोधडीवानी माझं अंग शिवावं लागलं’ पीडित महिलेने तिच्या सहन कराव्या लागणाऱ्या वेदनांबद्दल मोकळेपणाने बोलताना सांगितले की, “माझ्यावर तो एवढे वार करत होता की, डॉक्टरला अक्षरशः गोधडीसारखं माझं अंग शिवावं लागलं. इतकी जखमी झाले की शरीरात एकही अवयव शाबूत राहिला नाही. प्रत्येक जखमेवर टाके पडले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तीव्र वेदना होत आहेत.” रडायचीही भीती वाटते!तिच्या मते, “इतक्या खोल जखमा झाल्या आहेत की, जर डोळ्यात पाणी आलं, तर ते अश्रू जखमेवर पडून आग उठते. वेदना सहन होत नाहीत, पण रडायलाही भीती वाटते.” नराधमाची निर्दयी वृत्ती – गावात उघडपणे फिरत होता! अभिषेक नवपुते या नराधमाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. तिच्या नकारानंतर त्याने तिच्यावर धारदार कटरने सपासप वार केले. एवढ्या भयंकर कृत्याचा त्याला अजिबात पश्चात्ताप नव्हता. तो गावात अगदी सामान्य माणसासारखा वावरत होता. 280 टाके, सव्वादोन फूट लांब जखम! पीडितेच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती ही महिला सध्या खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या उपचारासाठी मोठा खर्च येत असून, तिच्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे नाहीत. तिच्या दोन लहान मुलांचे भवितव्यही धोक्यात आले आहे. नेमकं काय घडलं? महिला शेतात काम करत असताना आरोपीने तिला फोन करून “एकतर तू माझ्यासोबत झोप, नाहीतर जावेला माझ्यासोबत जुळवून दे!” अशी घृणास्पद मागणी केली. तिने फोन कट केल्यानंतर, संध्याकाळी ती एकटी जात असताना त्याने पाठीमागून येऊन तिचे केस धरून तिचे डोके दगडावर आपटले. त्यानंतर, पोलीस कारवाई आणि आरोपीला शिक्षा मिळणार का? या घटनेनंतर संतप्त जनतेने आरोपीस कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असली, तरी अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे समाजातून आवाज उठत आहे.