Indrajit Sawant
Updates

Indrajit Sawant यांना अटक करा म्हणणाऱ्या करनी सेनेचा History!

एकीकडे प्रशांत कोरटकर व Indrajit Sawant यांचा वाद सुरु असताना दुसरीकडे इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करनी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. इतिहासकार इंद्रजीत सांवत हे ब्राह्मण आणि राजपूत यांच्या विरोधात यु-ट्यूब चॅनलमध्ये चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप करत करणी सेनेने इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करणारी करणी सेना काय आहे? तेच जाणून घेऊयात.. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या करणी सेनेचे नावच अनेकांना बुचकळ्यात टाकत, त्यामुळे पहिल तर या सेनेचे नाव करणी सेना का आहे ते पाहुयात. करणी सेना ही एक ना-नफा संस्था आहे. काही राजपूत बेरोजगार युवकांनी २३ सप्टेंबर २००६ ला जयपूरमध्ये करणी सेना नावाची सामाजिक संघटना स्थापन केली. राजस्थानी राजपूतांचे श्रद्धास्थान असणारी देवी करणी माता यांच्या नावावरून करणी सेना असं नाव या संघटनेला देण्यात आल होत. आता या मूळ संघटनेमध्ये मोठी फूट पडली असून त्यामध्ये अनेक गट पडले आहेत. सध्या लोकेंद्र सिंह कालवी यांच्या नेतृत्वात असलेली श्री राजपूत करणी सेना, अजित सिंह ममदोली यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना समिती आणि सुखदेव सिंह गोगामेदी यांच्या नेतृत्वांतर्गत असलेली श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सर्वात जास्त प्रभावी आहे. करणी सेना ही संघटना भारतातील राजपूतांचे रक्षण करणे आणि राजपूत संस्कृतीचे जतन करणे हे एक समान उद्दिष्ट ठेवून स्थापन करण्यात आली होती. तथापि, आपल्या १७ वर्षांच्या अस्तित्वात करणी सेना अनेकदा अनेक वादांशी जोडली गेली आहे. पद्मावत’ चित्रपटाला विरोध केल्यानंतर करणी सेना चर्चेत आली होती. २०१७ मध्ये, संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातील ‘घूमर’ गाणे प्रदर्शित झाल्यानंतर करणी सेनेने मुख्य अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना जाहीरपणे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. करणी सेनेच्या हिंसक निषेधामुळे संजय लीला भन्साळींना चित्रपटाचे नावही बदलावे लागले होते. अश्यातच आता करणी सेनेने इंद्रजीत सावंतांना धमकी दिली आहे. “वारंवार ब्राम्हण आणि राजपूत समाजाविरोधात इंद्रजीत सावंत यांच्याकडून स्टेटमेंन्ट करण्यात येते. विदेशी लेखकांचा इतिहास वाचून इंद्रजीत सावंत बोलत असल्याचा आरोपही करनी सेनेच्या सेंगर यांनी केला आहे. त्यामुळे, समाजात दुही माजवली जात असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा” अशी मागणी करनी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. करणी सेनेच्या या मागणीमुळे आधीच प्रशांत कोरटकर प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या इंद्रजीत सावंतांना आता करणी सेनाचा सामना करावा लागणार असल्याचं पहायाला मिळतंय. तर यावर तुमचं मत काय? ते कंमेंट करून नक्की सांगा…