भारतीय फुटबॉल संघाचा दिग्गज खेळाडू Sunil Chhetri आपल्या निवृत्तीनंतर अवघ्या १२ महिन्यांतच पुन्हा मैदानावर परतणार आहे. भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक मनोलो मार्क्वेझ यांनी 26 सदस्यीय संघाची घोषणा केली असून त्यात 40 वर्षीय छेत्रीचे नाव समाविष्ट आहे. छेत्रीचे पुनरागमन का? 👉 19 मार्चला भारत आणि मालदीव यांच्यात मैत्रीपूर्ण सामना होणार आहे.👉 25 मार्चला भारत बांगलादेशविरुद्ध AFC Asian Cup Saudi Arabia 2027 पात्रता फेरीतील पहिला सामना खेळणार आहे.👉 हा सामना शिलाँगच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय संघासमोर मोठे आव्हान! 🔹 भारताच्या पात्रता गटात हाँगकाँग (चीन) आणि सिंगापूरसारख्या संघांचा समावेश आहे.🔹 भारत अद्याप AFC Asian Cup च्या गट फेरीतून पुढे जाऊ शकलेला नाही.🔹 मागील स्पर्धेत सर्व सामने गमावल्यानंतर संघासाठी ही मोठी संधी आहे.