महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय – घरकुलांसाठी वाळू मोफत! महाराष्ट्र सरकारने घरकुलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केले की, घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार, हे धोरण लवकरच अमलात येईल. वाळू धोरण मंत्रिमंडळासमोर वाळूच्या तुटवड्यावर उपाय सरकारच्या या निर्णयाचा फायदा कोणाला होणार? घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी ५ ब्रास वाळू मोफत मिळणार.
बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळणार, कारण वाळूच्या टंचाईमुळे कामे थांबत होती.
वाळूचा काळाबाजार थांबवण्यासाठी सरकारचा पुढाकार.