Jaykumar Gore प्रकरणात आजवर अनेकांनी आरोप प्रत्यारोप केले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तर या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरीचं चालतं होत्या. पण आज स्वतः मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी जयकुमार गोरे प्रकरणावर भाष्य करत, या प्रकरणाशी संबंध असल्याचं म्हणत Supriya Sule and Rohit Pawar यांचा या सगळ्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. तर याप्रकरणी पुढील चौकशी होणार असल्याचं देखील स्पष्ट केलय. म्हणूनच देवेंद्र फडणवीस विधानभवनात काय म्हणाले? त्यांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर कोणते गंभीर आरोप केले आहेत? काही दिवसांपूर्वी अचानक २०१६ सालाच जयकुमार गोरे यांचं प्रकरण समोर आलं होत. त्यानंतर हळू हळू या प्रकरणाने जोर पकडला आणि रोज नवनवीन माहिती आणि खुलासे या प्रकरणात होत होते. ज्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली होती. याकाळात अनेक आरोप करण्यात आले, अश्यातच जयकुमार गोरे यांना धमकी देणाऱ्या महिलेला खंडणी घेताना रंगेहाथ पकडल्यामुळे या प्रकरणाला एक नवीनच वळण लागले. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होणार? याकडे अनेकांचं लक्ष्य लागले होते. अश्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे प्रकरणावर सभागृहात भाष्य करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “मंत्री जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात घडलेली घटना दुदैवी आहे. कोणाला जीवनातून उठवण्याच्या उद्देशाने राजकारण होत असेल तर ते चुकीचे आहे. त्यांच्यासंदर्भातील केस 2016 मध्ये घडली, 2019 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता देखील झाली होती. ते तेव्हा भाजपमध्ये नव्हते. त्यानंतर अचानक हे प्रकरण उकरून काढले गेले. अशा प्रकरणांमध्ये कुटुंबात, समाजात अपमान होईल या भीतीपोटी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मी जयकुमार गोरे यांच्या हिमतीची दाद देतो. त्यांना ज्यावेळी लाजेची मागणी झाली त्यावेळी त्यांनी पोलिसात तक्रार केली. तेव्हा ट्रॅप लावण्यात आला. सगळी मागणी, संवाद टेप झाला. पोलीस विभागाची खात्री पटल्यानंतर सापळा रचून कॅश देताना आरोपीला पकडण्यात आले. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता.” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यांनी विधानभवनात केलं. या वेळी सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात काय समोर आलं आहे, याबद्दल देखील माहिती दिली आहे. ही महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील आहे असा खोटा प्रचार करण्यात आला. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला, युट्युबर व पत्रकार तुषार खरात आणि अनिल सुभेदारसह काही लोकांचा हा नेक्सस असल्याचं आढळलं आहे. हे सर्व एकमेकांशी संबंधित आहेत. या लोकांनी जो कट रचला त्याचे सगळे पुरावे सापडले आहेत. त्यांचे त्यांचे दीडशे फोन झालेले आहेत, ते सगळे सापडले आहेत. दुदैवाची गोष्ट म्हणजे या सर्वांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते थेट संपर्कात दिसत आहेत. प्रभाकरराव देशमुख यांच्याशी आरोपी बोलत होते. त्याहीपेक्षा वाईट वाटतं की सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरातसोबत झाले आहेत. तसेच आरोपींनी तयार केलेले व्हिडीओ देखील त्यांना पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असून, आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे, हे देखील त्यांनी स्प्ष्ट केलं आहे. तर “शेवटी त्यांच्याही घरी 22 वर्षांची मुलगी आहे. त्या मुलीवर काय परिणाम होत असेल? याचा विचार आपण करायला हवा. आपण राजकीय शत्रू नाही, राजकीय विरोधक आहोत, अशाप्रकारे कोणाला जीवनातून उठवणे चुकीचे आहे” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे कान देखील टोचले आहेत
Tag: Devendra Fadnavis
पत्र काय पाठवताय, थेट कुदळ फावडे घ्या! – Sanjay Raut चा भाजपावर हल्लाबोल
शिवसेना (ठाकरे गट) खासदार Sanjay Raut यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर भाजपवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शेखावत यांना औरंगजेबाच्या कबरीबाबत पत्र लिहिल्याच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी भाजपाला डिवचलं आहे. राऊत म्हणाले, “पत्रबाजी थांबवा आणि थेट कुदळ-फावडं घ्या!” त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्य आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना केवळ पत्रव्यवहार करण्याची गरज काय? बाबरी मशीद पाडताना परवानगी घेतली नव्हती, मग आता कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्य मुद्दे:
एकनाथ शिंदे यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर थेट निशाणा – “जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा!”
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “औरंगजेब जितका क्रूर होता, तितकेच फडणवीसही क्रूर आहेत” असे विधान केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या विधानावर टीका करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदेंचा सपकाळ यांना प्रत्युत्तर: “ज्या औरंगजेबाने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, त्याची तुलना तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी करता? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून काम करतो. आम्ही राज्यासाठी लोकाभिमुख योजना आणल्या, विकासाची गती वाढवली. आमच्या कार्याची पोचपावती म्हणून जनतेने आम्हाला लँडस्लाईड मँडेट दिले. मुख्यमंत्री म्हणून आता देवेंद्र फडणवीस आणि आम्ही टीम म्हणून काम करत आहोत.“ “कुठे औरंगजेब आणि कुठे देवेंद्र फडणवीस? अशी तुलना करण्यापूर्वी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी होती,” असे शिंदे म्हणाले. औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर संताप: “औरंगजेबाने महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तो देशद्रोही होता. त्याचं समर्थन करणारा कोणताही भारतीय देशभक्त असू शकत नाही. मग काँग्रेस नेते हे समर्थन का करत आहेत? यांचा औरंगजेब कोण लागतो? नातेवाईक आहे का? सगासोयरा आहे का?” असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला. औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटला: औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वादंग माजले असून “ही कबर उखडून काढा” अशी मागणी सत्ताधारी गटातून होत आहे. नागपुरात या मुद्यावरून हिंसाचार, दगडफेक आणि पोलिसांवर हल्ला झाला आहे. परिस्थिती बिघडू नये म्हणून प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. 📌 महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या तापलेले असून, हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
शेतकरी नेते Ravikant Tupkar भूमिगत; आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न फसणार?
मुंबईत शेतकरी आंदोलन पुकारले जाण्यापूर्वीच राज्य सरकारने पोलिसांच्या माध्यमातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना रात्रीतून अटक करून आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर भूमिगत झाले असले तरी आंदोलन होणारच, असे त्यांनी ठणकावले आहे. राजकीय दबावाखाली पोलिसांची कारवाई? बुलढाणा पोलिसांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, डॉ. ज्ञानेश्वर टाले, सहदेव लाड यांना मध्यरात्री झोपेतून उठवून अटक केली. रविकांत तुपकर यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला असून, त्यांची गाडी व चालकदेखील पोलिस ताब्यात घेतल्याचे समजते. “शेतकरी आंदोलन रोखण्यासाठी सरकार पोलीस यंत्रणेचा वापर करत आहे. पोलिस कुणाच्या इशाऱ्यावर हे सगळं करत आहेत?” असा संतप्त सवाल शेतकरी संघटनांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या या मागण्यांसाठी १९ मार्च रोजी मुंबईत मोठे आंदोलन होणार होते. मात्र, आंदोलन दडपण्यासाठी राज्य सरकारकडून पोलिसांना पुढे करून दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. रात्रीभर शेतकरी नेत्यांची धरपकड राज्यात विविध भागांमध्ये शेतकरी नेत्यांना अटक करण्याचे सत्र सुरू आहे. बिबी, मोताळा, देऊळगाव राजा, मेहकर, जळगाव जामोदसह अनेक भागांत पोलिसांनी अटकसत्र राबवले आहे. रात्री १२.३० वाजता: अक्षय पाटील, वैभव जाणे, अजय गिरी (जळगाव जामोद)रात्री २.०० वाजता: उमेशसिंह रजपूत, प्रदीप शेळके, बंडूभाऊ देशमुख (मोताळा)रात्री ४.३० वाजता: गणेश गारोळे, हरी आसबे, आत्माराम बंगाळे, समाधान गाडे (मेहकर)सकाळी ५.०० वाजता: विनायक सरनाईक, भगवानराव मोरे, भारत वाघमारे (चिखली) अनेक शेतकरी नेत्यांच्या गाड्या जप्त करून त्यांना मुंबईकडे जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “फडणवीस सरकारला आंदोलनाची भीती!” राज्य सरकारवर टीका करत शर्वरीताई तुपकर यांनी आंदोलन चिरडण्याच्या प्रयत्नांचा निषेध व्यक्त केला. “सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे तिजोरीत पैसा नाही. कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार अडचणीत येईल म्हणून आंदोलन रोखले जात आहे. पण शेतकरी झुकणार नाहीत!” असे त्यांनी ठणकावले. आता पुढे काय? शेतकरी संघटनांनी राज्यभर संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, पोलिसी कारवाईला विरोध केला जात आहे. रविकांत तुपकर भूमिगत असले तरी मुंबईतील आंदोलन होणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राजकीय वातावरण तापले असून सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे. पुढील काही तासांत शेतकऱ्यांच्या प्रतिकाराचे नवे स्वरूप दिसण्याची शक्यता आहे.
Dhananjay Munde यांचा राजीनामा – मंत्रिपद गेलं, पण सरकारकडून दिलासा मिळणार?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच Santosh Deshmukh यांच्या हत्येप्रकरणानंतर अखेर मंत्री Dhananjay Munde यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. गेल्या ८० दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. मात्र, सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हत्येच्या क्रूर छायाचित्रांमुळे राजकीय दबाव अधिक वाढला. यानंतर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी तातडीने धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे निर्देश दिले. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि राजकीय उलथापालथ ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली. हत्येच्या तपासात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. जवळपास दोन तास चर्चा झाल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मंगळवारी पहाटे धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुढे काय? एकीकडे धनंजय मुंडेंचे मंत्रिपद गेले असले तरी त्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ➡️ सूत्रांच्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी केले जाणार नाही.➡️ सीआयडीच्या आरोपपत्रात त्यांच्याविरोधात कोणताही थेट पुरावा नाही, त्यामुळे सरकारकडून त्यांच्यावर पुढील कार्यवाही होण्याची शक्यता कमी आहे.➡️ राजीनाम्यानंतरही मुख्यमंत्री कार्यालय मुंडे प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.➡️ अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे सहभागी होतील का? याकडे आता लक्ष लागले आहे. धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया अद्याप नाही धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पुढील काही दिवसांत त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत मोठे निर्णय घेतले जातील.
Maratha आरक्षण आंदोलनावर सरकारचा नवा Plan? Jarange Patil
मराठा आरक्षण नेते Manoj Jarange Patil यांनी एक नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी सरकार स्वतःचे चळवळ उभी करणार आहे. सरकारचे दोन मंत्री या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन मंत्र्यांची चर्चा झाल्याची माहिती एका मंत्र्याने त्यांना दिली आहे. Manoj Jarange Patil काय म्हणाले माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकार आणखी एक मराठा आंदोलन उभे करणार आहे. त्या आंदोलनात दोन मंत्री असणार आहेत. ते 12 ते 13 दिवस अमरण उपोषण करणार आहेत. त्यातील एका मंत्र्याने मला ही माहिती दिली. त्यानंतर 14 दिवसांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्यात येणार आहे. सरकार दोन मंत्र्यांना सोबत घेत नवीन मराठा आरक्षण आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहे. Devendra Fadnavis मंगळवारपर्यंत आरक्षणाचा मार्ग काढतील. हैद्राबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट लागू करतील, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, तीन्ही गॅझेट मंगळवारपर्यंत लागू होतील अशी मला आशा आहे. शिंदे समिती कडे सात महिन्यांपासून गॅझेटचा विषय आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास झाला आहे. पंधरा दिवसांत संपूर्ण अभ्यास केला जातो. भाजपचा सुरेश धस यांच्यावर दबाव? मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी सुरेश धस यांच्यावर भाजपने दबाव टाकला होता. जर त्यांनी हे मराठा समाजाला सांगितले असते, तर जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिला असता. पण त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने मराठा समाजाच्या भावनांचा विश्वासघात झाला. त्याचबरोबर, धनंजय मुंडे आणि आमदार धस यांच्या भेटीमुळे संतोष देशमुख प्रकरणात फेरफार होण्याची शक्यता आहे. जर या प्रकरणातील आरोपी सुटले, तर सरकारसाठी हे संकट निर्माण होऊ शकते, असा गंभीर इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Maharashtra BJPचा महास्वागत! 1 कोटींहून अधिक सदस्य नोंदणीचा विक्रम
भाजपाने महाराष्ट्रात एक ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. विधानसभा निवडणुकीतील महालाटेनंतर आता सदस्य नोंदणी मोहीमही प्रचंड यशस्वी ठरली आहे. भाजपाने राज्यात 1 कोटींहून अधिक सदस्य नोंदणी करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी भाजपाने आपली संघटनशक्ती अधिक बळकट केली आहे. भाजपाच्या नेतृत्वाची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “1 कोटी सदस्य ही केवळ संख्या नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेचा भाजपावरील दृढ विश्वास आहे.” प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, पुढील 15 दिवसांत “संघटन पर्व” राबवण्यात येणार असून, दीड कोटी सदस्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. सदस्य नोंदणी यशस्वी होण्यामागील रणनीती भविष्यातील लक्ष्य आणि राजकीय प्रभाव भाजपाने येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी मोठी तयारी सुरू केली आहे. दीड कोटी सदस्यांचा टप्पा गाठण्याचा संकल्प केला असून, हे संघटन पक्षाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावेल.
पुणे आणि पुणेकरांबद्दल विधान व्हायरल : Devendra Fadnavis
नागपूरमध्ये एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पुणेकरांबाबत केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पुणेकरांच्या खास स्वभावविशेषांवर त्यांनी विनोदी अंदाजात भाष्य केल्यामुळे सोशल मीडियावर यावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नागपूरमध्ये काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? नागपूरमध्ये आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या कार्यक्रमात नागपूर मेट्रोच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध मेट्रो प्रकल्पांबद्दलचा आढावा घेतला आणि पुणेकरांच्या स्वभावावर हलकंफुलकं भाष्य केलं. पुणे आणि पुणेकरांबद्दल विधान फडणवीस म्हणाले, “पुणे हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर आहे. मात्र, पुणेकर हे नेहमीच थोडं वेगळं असतं. ते एखाद्या गोष्टीचं कौतुक करताना पण एक विनोदी टीप्पणी देतात. त्यामुळे पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाबद्दल बोलणंही आव्हानात्मक असतं.” सोशल मीडियावर चर्चेचा विषय त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर पुणेकरांनी विनोदी आणि गंमतीशीर प्रतिक्रियांची रांग लावली आहे. काहींनी त्यांच्या विधानाचं समर्थन केलं, तर काहींनी विनोदाने घेतलं. महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांची वाटचाल कार्यक्रमात फडणवीसांनी नागपूर मेट्रो, पुणे मेट्रो, आणि इतर प्रकल्पांबद्दलही चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्प हे देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहेत. नागपूर मेट्रो हा वेगवान आणि लोकाभिमुख प्रकल्प आहे.“