नारिकतत्व विकणे हो तुम्ही बरोबर ऐकलंत… America ने त्यांच्या देशाचं नागरिकत्व थेट विकायला काढलाय… अमेरिकेच नागरिकत्व मिळवण्यासाठी आता अमेरिकेतील नोकरी किंवा छोकरी मिळवण्याची गरज नाहीये, कारण आता आपल्याला अमेरिकेचं नागरिकत्व विकत घेता येणार आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा अनोखा निर्णय घेतला आहे. म्हणूनच हा नवीन निर्णय काय आहे? अमेरिकेचं नागरिकत्व किती रुपयांना मिळणार आहे? डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची मोहीम सुरू केली होती. भारतातील अवैध स्थलांतरितांना घेऊन तीन विमाने आली होती. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम हा अमेरिकेसहित जगभरावर होत आहे. या निर्णयाचा भारतालाही फटका बसला आहे. आणि आता याच कारवाईनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यात अमेरिकेचे नागरिक होऊ इच्छिणाऱ्यांना आता अमेरिकेचे नागरिकत्व विकत घेता येणार आहे. यासाठी नवीन गोल्ड कार्ड योजना ट्रूम्प सरकारने सुरु केली आहे. अमेरिकन नागरिकता बनायचे असेल तर ट्रम्प यांनी एक अनोखी योजना जाहीर केली आहे. या योजनेद्वारे जगभरातील कोणत्याही नागरिकाला अमेरिकेचे नागरिकत्व विकत घेता येणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा अनोखा निर्णय घेतला असून या योजनेद्वारे 5 मिलियन डॉलर्सला कोणालाही अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार आहे. या 5 मिलियन डॉलर्सची भारतीय रुप्यांमधील किंमत तब्बल 43 कोटी रुपये इतकी आहे. 43 कोटी रुपये भरले आणि संबधित सगळी प्रोसेस फॉलो केली तर भारतातीलच काय जगभरातील कोणत्याही व्यक्तीला गोल्ड कार्ड अर्थात अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार आहे. यापूर्वी १० लोकांना पूर्णवेळ नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत ईबी-५ ग्रीन कार्ड योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना अमेरिकेतील व्यावसायात गुंतवणूक करून नागरिकत्व मिळवता येत होते. याच ग्रीन कार्डची जागा आता हे गोल्ड कार्ड्स घेणार आहे. पैसे भरा आणि अमेरिकेचे नागरिक व्हा अशी योजना ट्रम्प यांनी जाहीर केली असून या योजनेला ‘गोल्ड कार्ड’ असं नाव देण्यात आलं आहे. ज्यात 5 मिलियन डॉलर्स अर्थात 43 कोटी देणाऱ्या देणाऱ्या व्यक्तीला गोल्ड कार्ड मिळणार आहे. ज्याद्वारे ते कायमस्वरूपी अमेरिकेचे नागरिक होऊ शकतात. “EB-5 ग्रीन कार्ड योजनेची जागा आता गोल्ड कार्ड्स घेणार आहे. या माध्यमातून गोल्ड कार्ड्स घेणाऱ्यांना अमेरिकेचे कायमस्वरुपी नागरिकत्व दिले जाईल. गोल्ड कार्ड्सच्या माध्यमातून ग्रीन कार्डप्रमाणेच लाभ मिळू शकणार आहेत. या योजनेबद्दलची अधिक माहिती दोन आठवड्यात जाहीर करू, श्रीमंत लोक अमेरिकेत आल्यास त्यांच्या श्रीमंतीमध्ये आणखी वाढ होईल. ते अधिक यशस्वी होतील. त्यांना इथले कर भरावे लागतील, इथल्या लोकांना रोजगार द्यावा लागेल. ही योजना अभूतपूर्व असे यश मिळवले, यात शंका नाही”, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी हि योजना जाहीर करताना केलं आहे. दरम्यान, आपल्या देशाचे नागरिकत्व विकणारा अमेरिका हा काही पहिलाच देश नाहीये. जगाभरात अनेक देश पैसे घेऊन त्यांच्या देशाचे नागरिकत्व देतात. ज्याला CBI अर्थात सिटिझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. UAE, तुर्कि, मॉरिशस, स्पेन अश्या अनेक देशांचे नारिकत्व आपल्याला पैसे देऊन घेता येते.