महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी घडली धक्कादायक घटना पुणे शहरात (Pune Crime News) महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. कालच स्वारगेट परिसरात (Swargate Crime) एका तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती, आणि त्यानंतर आता आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत (IT Company in Pune) कार्यरत असलेल्या तरुणीचा कॅब चालकाने विनयभंग (Cab Driver Molestation) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चालत्या कॅबमध्ये विकृत चाळे, तरुणीचा धाडसी निर्णय ही घटना प्रवासादरम्यान घडली. कॅब चालकाने (Cab Driver Crime) आरशात पाहून अश्लील हावभाव करत विकृत चाळे सुरू केले. आपल्या सुरक्षिततेचा विचार करत या तरुणीने प्रसंगावधान दाखवत चालत्या कॅबमधून (Jumped from Moving Cab) उडी घेतली. यानंतर तिने सुमारे 2 किलोमीटर धावत खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) पोहोचून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कॅब चालकाला ताब्यात घेतले आहे. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी (UP Resident Cab Driver) असल्याची माहिती समोर आली आहे. महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह! सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात घडलेल्या या घटनांमुळे (Pune Women Safety) महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यापूर्वी स्वारगेट बस स्थानकात (Swargate Bus Stand Crime) एका तरुणीवर बलात्कार झाला होता. त्यामुळे महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी, सुरक्षित प्रवासासाठी सरकारी यंत्रणेने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. पोलिसांचे स्पष्टीकरण व पुढील तपास या घटनेनंतर पुणे पोलिसांनी (Pune Police Action) तातडीने तपास सुरू केला असून, संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेसाठी काही ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत. Write something…