मराठमोळी अभिनेत्री Prajakta Mali ही आपल्या सोज्वळ लूकसाठी ओळखली जाते. मात्र, एका इव्हेंटमध्ये Bold Look कॅरी करताना तिला काहीसं अनकम्फर्टेबल वाटलं. नुकत्याच दिलेल्या Interview मध्ये तिने हा अनुभव सांगितला. रेड कार्पेटवर Bold Look मध्ये अस्वस्थ? एका TV Channel ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने सांगितले की, एका Event साठी तिला स्टायलिस्टने खास Saree आणि ब्लाऊज दिला होता. पण तो ब्लाऊज खूप छोटा असल्याने ती अस्वस्थ झाली. “स्टायलिस्टने मला एक सुंदर पण Bold Saree दिली होती. पण त्यावरचा ब्लाऊज खूप छोटा होता. मी मोठा करायला सांगितलं, पण आधीच मोजमाप दिलं होतं, असं तिने सांगितलं. मी तो ब्लाऊज घातल्यावर लक्षात आलं की मी तो कॅरी करू शकणार नाही,” असं प्राजक्ता म्हणाली. ब्लाऊज बदलण्याचा प्रयत्न फसला! प्राजक्ताने स्वतः ब्लाऊज थोडा मोठा करण्याचा प्रयत्न केला, पण यश आलं नाही. त्यामुळे तिला रेड कार्पेटवर तसाच लूक कॅरी करावा लागला. “माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता, त्यामुळे मी आत्मविश्वासाने रेड कार्पेटवर गेले. मी तिथे बोल्ड दिसले असणार, पण मी चेहऱ्यावर काहीही न दाखवता कॉन्फिडन्स ठेवला,” असं तिने स्पष्ट केलं.