तुझ्या डोक्यात घाणच भरलीय,अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली, समाजाच्या नियमांविरोधात बोलण्याचा कोणालाही परवाना मिळालेला नाही. ही अश्लीलता नाही तर काय आहे? आई-वडिलांना, बहिणींना लाज वाटेल असे तुमचे शब्द आहेत. अश्या कठोर शब्दांमध्ये Ranveer ला सुप्रीम कोर्टाने सुनावलं आहे, तसेच त्याला या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोणताही शो करता येणार नाहीये. म्हणूनच नेमकं आजच्या सुनावणीत कोर्टाने काय म्हटलंय? रणवीरची बाजू मांडणाऱ्या वकिलांना कोर्टाने कोणता प्रतिप्रश्न केलाय?
इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये एका स्पर्धकाला आईवडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारणाऱ्या रणवीर अलाहबादियाविरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. त्याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्यामध्ये त्याच्याविरुद्धचे सर्व एफआयआर एकत्र करावेत, अशी विनंती करण्यात आली होती. तसेच, याप्रकरणी लवकर सुनावणी घेण्याची मागणीही रणवीरनं केली होती. आणि त्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
भारताचे माजी मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे पुत्र वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयात रणवीर अलाहबादियाची बाजू मांडली. “जीभ कापण्यासाठी 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. एका माजी कुस्तीपटूनं म्हटलंय की, आपण कोणत्याही पक्षात भेटलो तरी, त्याला सोडता कामा नये. हे सर्व 10 सेकंदांच्या क्लिपसाठी.” असं म्हणत जेव्हा रणवीरचे वकील अभिनव चंद्रचूड त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कोर्टाने ते रणवीरच्या भाषेचा बचाव करत आहेत का? असा सवाल विचारला तर “धमकी देणाऱ्यांनाही रणवीरसारखंच चर्चेत राहण्याचा शौक असेल.” असं कोर्टाने म्हटलं आहे.
“जर हे अश्लील नाही तर काय आहे? तुम्ही तुमचा अश्लीलपणा आणि असभ्यपणा कधीही दाखवू शकता… फक्त दोनच एफआयआर आहेत. एक मुंबईत आणि एक आसाममध्ये… स्वातंत्र्य हा वेगळा मुद्दा आहे. प्रत्येक बाबतीत तुम्हीच लक्ष्य असता आणि तुम्हीच त्यात सामील असता असं नाही. समजा 100 एफआयआर आहेत, तर तो म्हणू शकतो की, तो स्वतःचा बचाव करू शकत नाही.अशा वर्तनाचा निषेध केला पाहिजे. फक्त तुम्ही लोकप्रिय आहात म्हणून तुम्ही समाजाला हलक्यात घेऊ शकत नाही. जगात असा कोणी आहे का? ज्याला अशी भाषा आवडेल? ज्याच्या डोक्यात खूप काहीतरी वाईट चाललंय. आपण त्यांचा बचाव का करावा?” अश्या शब्दात रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे.
तर आजच्या सुनावणीतील महत्वाचे मुद्दे काय आहेत ते पाहुयात. “रणवीरविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांप्रकरणी त्याला अटकेपासून दिलासा दिला असून यानंतर रणवीरविरोधात त्या विधानांसाठी कोणताही नवीन गुन्हा दाखल होणार नाही, जर अलाहाबादियाला स्वतःच्या जीविताला धोका आहे असं वाटत असेल, तर तो महाराष्ट्र किंवा आसामच्या स्थानिक पोलिसांकडे संरक्षणाची मागणी करू शकतो. रणवीर अलाहाबादियानं त्याचा पासपोर्ट ठाणे पोलिसांकडे जमा करावा, न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्याला विदेश प्रवास करता येणार नाही असं . तर रणवीर अलाहाबादियानं या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोणताही शो करू नये.” असं कोर्टाने आजच्या सुनावणीत म्हंटलं आहे.
सध्या तरी Ranveer च ते एक वक्तव्य त्याला भरपूर महागात पडताना दिसतंय, बाकी या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे… तर यावर तुमचे मत काय?.