India आजच्या बातम्या

Sunita Williams : अंतराळातून लवकरच घरवापसीची चांगली बातमी!

Spread the love

Sunita Williams आणि Buch Willmore मागील आठ महिन्यांपासून International Space Station मध्ये होते. अखेर त्यांची पृथ्वीवर परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. NASA आणि SpaceX यांनी त्यांच्या मिशनमध्ये बदल करत नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.

NASA च्या Commercial Crew Program च्या मॅनेजर Steve Stich यांनी सांगितले की, “Human Space Mission अनेक आव्हानांनी भरलेली असते.” Boeing च्या Starliner Capsule मध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे ही मोहीम रखडली होती. त्यामुळे रिकामी कॅप्सूल पृथ्वीवर परतवण्याचा निर्णय घेतला गेला आणि SpaceX वर विल्यम्स व विल्मोर यांना परत आणण्याची जबाबदारी सोपवली गेली.

SpaceX आता नवीन Capsule च्या प्रतिक्षा करण्याऐवजी पूर्वीच्या Capsule चाच वापर करणार आहे. त्यामुळे 12 मार्च 2025 पर्यंत हे Mission Launch होण्याची शक्यता आहे. आधी या Capsule चा वापर पोलंड, हंगेरी आणि भारताच्या अंतराळवीरांसाठी करण्यात येणार होता, पण आता त्यांचे Mission पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे Sunita Williams आणि Buch Willmore लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *