सर्दी झाल्यावर नाक बंद होणे हे एक सामान्य आणि त्रासदायक लक्षण आहे. नाक बंद झाल्यामुळे श्वास घेण्यात अडचणी येतात, आणि सामान्य जीवनातही अडचणी निर्माण होतात. थंडीमुळे नाकातील उतींमध्ये सूज येऊन नाक बंद होऊ शकते. या त्रासातून आराम मिळवण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय आहेत, जे तुम्हाला सहज घरच्या घरी करू शकता. चला, तर मग, जाणून घेऊया काही घरगुती उपाय जे नाक बंद झाल्यामुळे होणारा त्रास कमी करू शकतात.
१. वाफ घेणे
वाफ घेतल्याने नाकातील सूज कमी होऊन नाक मोकळे होण्यास मदत होते. वाफ हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे, जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे. तुम्ही गरम पाण्यात लवंगाचे तेल किंवा लवंग बारीक करून टाकून त्याची वाफ घेतल्यास नाकातील अडचण कमी होईल आणि श्वास घेणे सोपे होईल.
२. मोहरीचे तेल
लहान मुलांचे नाक बंद झाले असल्यास, मोहरीचे तेल एक अत्यंत प्रभावी घरगुती उपाय ठरतो. मोहरीचे तेल नाकात दोन थेंब टाकून काही वेळ झोपल्याने नाक मोकळे होऊ शकते. हा प्राचीन उपाय आजही खूप फायदेशीर ठरतो.
३. तुळशीची पाने आणि काढा
तुळशीच्या पानांचा काढा सर्दी आणि नाक बंद होण्यामुळे होणारा त्रास दूर करण्यासाठी एक उत्कृष्ट उपाय आहे. काही तुळशीच्या पानांचे, लवंग, आले आणि काळी मिरीचे मिश्रण पाण्यात उकळून, तो काढा पिऊन नाक मोकळे होण्यास मदत होते. हा काढा दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावा, यामुळे लवकर आराम मिळतो.
४. ओव्याची पोटली
ओवा नाक मोकळे करण्यासाठी एक चांगला उपाय आहे. ओवा तव्यावर भाजून त्याची गरम पोटली तयार करा आणि त्याचा वास घेतल्यास नाकाच्या मार्गातील अडथळे दूर होऊ शकतात. हे उपाय लहान मुलांसाठी देखील खूप फायदेशीर ठरते.