India

Sudhanshu Shukla:आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाणारे भारताचे पहिले अंतराळवीर

भारतीय हवाई दलाचे पायलट सुधांशू शुक्ला हे आंतराळातील पहिले भारतीय अंतराळवीर ठरणार आहेत. २०१९ मध्ये, त्यांनी रशियाच्या प्रसिद्ध गगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर मध्ये अंतराळ यात्री म्हणून प्रचंड प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर इस्त्रो कडून त्यांची गगनयान मिशन साठी निवड झाली होती. आता ते नासा-एक्सिओम स्पेस मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) वर जाणार आहेत.

सुधांशू शुक्ला हे नासा च्या माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन यांच्या नेतृत्वाखालील मिशनमध्ये सहभागी होणार आहेत. या मिशनमध्ये ते मिशन कमांडर म्हणून काम करतील. त्यांच्यासोबत पोलंडचे स्लोज उझनान्स्की-विस्नीव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे दोन्ही मिशन तज्ज्ञ असणार आहेत. या मिशनच्या माध्यमातून भारतासोबत पोलंड आणि हंगेरीमध्येही पहिल्यांदाच अंतराळात थांबण्याची संधी मिळणार आहे.

ग्रुप कॅप्टन सुधांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (ISS) वर जाणारे भारताचे पहिले अंतराळवीर ठरणार आहेत. ते Ax-4 मिशन द्वारे अंतराळात जात आहेत. या मिशनमध्ये विविध वैज्ञानिक प्रयोग व आउटरीच कार्यक्रम देखील आयोजित केले जातील, जे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण (microgravity) स्थितीत होईल.

मिशनसाठी उत्सुकता व्यक्त करताना सुधांशू शुक्ला म्हणाले, “भारतातील लोकांसोबत अनुभव शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी सांस्कृतिक वस्तू आंतराळात घेऊन जाईन. तसेच, मी आंतराळ स्थानकावर योग मुद्रां चा अभ्यास देखील करू इच्छितो.” हा मिशन १४ दिवस चालेल आणि त्यादरम्यान चालक दल विविध वैज्ञानिक प्रयोग आणि इतर शैक्षणिक कार्यक्रम करणार आहे.

Ax-4 मिशन हे खासगी अंतराळवीरांना आंतराळात नेण्याचा एक महत्वाचा उपक्रम आहे, ज्यामुळे अधिकाधिक लोकांना अंतराळाची संधी मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *