आजच्या धावपळीच्या आयुष्यात Office Work केल्यानंतर घरी परतल्यानंतर थकवा आणि तणाव जाणवतो. सतत स्क्रीनसमोर बसून काम करणे, प्रवासाची धावपळ, कामाचा ताण यामुळे मेंदू आणि शरीर दोन्ही थकून जातं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटण्यासाठी आणि एनर्जी टिकवण्यासाठी काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया Office Stress आणि तणाव दूर करण्याच्या काही सोप्या पद्धती.
कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवा ऑफिसमधून परतल्यानंतर आपल्या जवळच्या माणसांसोबत वेळ घालवा. कुटुंबीयांसोबत संवाद साधा, त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारा. तुमच्या दिवसभराच्या अनुभवांबद्दल बोला आणि त्यांचे अनुभव ऐका. यामुळे मन मोकळं होईल आणि तणाव हलका वाटेल. जर तुम्ही घरापासून दूर राहत असाल तर फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे जवळच्या लोकांशी संपर्क साधा. मानसिक तणाव कमी करण्यासाठी हा उत्तम मार्ग ठरतो.
हलकीशी शारीरिक हालचाल करा दिवसभर बसून काम केल्यानंतर शरीराची हालचाल होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरी आल्यानंतर हलका व्यायाम करा, स्ट्रेचिंग किंवा योगा करा. जर जास्त वेळ नसेल तर रात्री जेवणानंतर १०-१५ मिनिटं चालण्याची सवय लावा. यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि शरीर ताजेतवाने वाटते. काही वेळ ध्यानधारणा केल्यास मन शांत राहतं आणि मानसिक तणावही दूर होतो.
आरोग्यदायी आहार आणि पुरेशी झोप घ्या थकवा दूर करण्यासाठी योग्य आहार आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. घरी आल्यावर जड अन्न न घेता हलका आणि पौष्टिक आहार घ्या. संध्याकाळच्या वेळी ग्रीन टी किंवा हर्बल टी घेतल्यास शरीराला आराम मिळतो. रोज किमान ७-८ तासांची शांत झोप घेणं गरजेचं आहे. योग्य झोप घेतल्याने मेंदू आणि शरीर ताजेतवाने राहते आणि पुढच्या दिवशी काम करण्यासाठी एनर्जी मिळते.
आवडीच्या गोष्टी करा ऑफिसमधून आल्यावर मनाला शांत ठेवण्यासाठी आणि रिलॅक्स होण्यासाठी तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. संगीत ऐका, चांगली पुस्तकं वाचा किंवा तुम्हाला आनंद मिळणाऱ्या अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा. हे केल्याने दिवसाचा थकवा निघून जातो आणि मन प्रसन्न होतं.
थोडं स्वतःसाठीही वेळ काढा दिवसभर कामानंतर स्वतःसाठी थोडा वेळ द्या. स्वतःशी संवाद साधा, तुमच्या दिवसाची समीक्षा करा आणि उद्याच्या कामांची रूपरेषा आखा. जास्त वेळ स्क्रीनसमोर न घालवता शांतपणे बसून मनन-चिंतन करा. यामुळे मन स्थिर राहतं आणि तणाव दूर होतो.
थकवा आणि तणाव दूर करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे ऑफिसनंतरच्या वेळेचा योग्य वापर करा आणि स्वतःला रिफ्रेश ठेवा. तुमचा अनुभव कसा आहे हे आम्हाला नक्की कळवा!