गेल्या 6 दिवसांपासून पोलीस Satish Bhosale शोधात होते. अखेर प्रयागराजमध्ये त्याला अटक करण्यात आली. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त मोहिमेमध्ये खोक्या सतीश भोसले जाळ्यात अडकला. त्याला उद्या बीड येथे आणले जाणार आहे.
🔴 खोक्या सतीश भोसले कसा पकडला गेला?
- बसने प्रवास करत तो प्रयागराजला पोहोचला होता.
- विमानाने देशाबाहेर पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला प्रयागराज विमानतळावर अटक केली.
- भोसलेचा मोबाईल नंबर पोलिसांच्या हाती लागल्याने त्याच्या लोकेशनचा मागोवा घेण्यात आला.
- त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे प्रयागराज पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले.
🔵 आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया
भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
👉 “सतीश भोसलेच्या अटकेमुळे कायद्याचा वचक निर्माण होईल. मी कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला फोन करून हस्तक्षेप केला नाही. जर त्याने चूक केली असेल, तर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी!”
📌 सतीश भोसले कोण आहे?
- तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी गावचा रहिवासी आहे.
- मागील 5 वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय असून भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पदाधिकारी आहे.
- सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने त्याची ओळख तयार झाली.
- सुरेश धस यांच्या जवळीकमुळे त्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रभाव वाढवला.
- याआधीही त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.