Bollywood

सलमान खानचा मुंबई रेल्वे स्थानकावर जलवा: भाईजानला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

Spread the love

बॉलीवूडचा दबंग सलमान खान याने मुंबईतील रेल्वे स्थानकावर एक दणक्यात एंट्री केली आहे, आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत, सलमान खान आपल्या बॉडीगार्ड्ससोबत मुंबईच्या रेल्वे स्थानकावर फिरताना दिसत आहे. स्थानकावर प्रचंड गर्दी असून, सलमानच्या आगमनाने उत्साही चाहते त्याच्या एक झलक पाहण्यासाठी एकत्र आले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खान आगामी चित्रपट सिकंदरच्या शुटिंगसाठी रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. व्हिडीओमध्ये पोलिसांच्या उपस्थितीमध्ये एक मोठा जमाव दिसतो, आणि प्रत्येकाचा लक्ष फक्त सलमानवर केंद्रित झालं होतं. हा व्हिडीओ सिकंदर चित्रपटाच्या एका दृश्याच्या शूटिंगदरम्यानचा आहे, जिथे सलमानच्या चारही बाजूंनी चाहते आणि गर्दी होती.

व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असताना एका चाहत्याने लिहिलं, “एआर मुरुगदास आम्हाला 1000 कोटी रुपयांचा सिनेमा देणार आहेत!” सलमानला पाहून लोकांच्या उत्साहाची सीमा गाठली आणि त्यांनी आरडाओरड सुरु केला. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपटाची माहिती असं सांगायचं झालं तर, सिकंदर हा एआर मुरुगदास दिग्दर्शित असून साजिद नाडियाडवाला निर्मित आहे. चित्रपटात काजल अग्रवाल, रश्मिका मंदाना, सत्यराज, शरमन जोशी आणि प्रतीक बब्बर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिकंदर 28 मार्च 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.

सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

सलमान खानच्या सुरक्षेसाठी आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही काळात सलमानला अनेक धमक्या मिळाल्या होत्या. 14 एप्रिलला वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार झाल्यानंतर, सलमानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याच्या सुरक्षेसाठी त्याने बुलेटप्रुफ कारही खरेदी केली आहे.

त्याचबरोबर, ज्येष्ठ राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला देखील धमक्या देण्यात आल्या होत्या. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान हिटलिस्टवर आला होता आणि गुंड लॉरेन्स बिष्णोईने सोशल मीडियावर या धमक्यांची जबाबदारी घेतली होती. त्याच्या सुरक्षेची आवश्यकता लक्षात घेता, सलमानच्या सुरक्षेचा स्तर अधिक मजबूत करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *