Ravindra Dhangekar Exposes NCP’s Shantanu Kukde! धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यामुळे आधीच अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party – NCP) अडचणीत आलेला असताना आता राष्ट्रवादीच्या अजून एका नेत्याचा प्रताप समोर आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असणाऱ्या शंतनु कुकडे (Shantanu Kukde) याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराचा पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेत (Shinde’s Shiv Sena) प्रवेश केलेल्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी एक भली मोठी पोस्ट लिहीत शंतनू कुकडेवर गंभीर आरोप करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने (Thackeray’s Shiv Sena) देखील याविरोधात आंदोलन केले आहे. म्हणूनच दोन्ही शिवसेनांना ऍक्टिव्ह मोडवर आणणार हे प्रकरण नेमकं काय आहे? तेच जाणून घेऊयात.
नेमके आरोप काय?
पुण्यातील कॅम्प (Camp, Pune) परिसरात एका अलिशान बंगल्यात राहणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनु कुकडे (Shantanu Kukde) याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराचा पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुलींचे धर्म परिवर्तन करण्यासाठी कुकडेला इंटरनॅशनल फंडिंग (International Funding) येत असल्याचा आरोपही होतोय. याप्रकरणी शंतनू कुकडे याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) गुन्हाही दाखल झाला आहे.
स्थानिकांचं काय म्हणणं आहे?
बंगल्याच्या मागे बियरच्या बाटल्या पडल्या आहेत. तो बंगल्यात डान्सबार (Dance Bar) चालवतो, पुणे शहरात वसतीगृहाच्या आलिशान बंगल्यात वरच्या मजल्यावर खूलेआम डान्सबार सुरु असतो. या बंगल्यासमोर आलिशान गाड्या येतात. अल्पवयीन मुलींना उभं केलं जातं. काही मुलींना चॉईस केलं जात. असा आरोप आजूबाजूच्या नागरिकांकडूनही होतोय. त्यामुळे शंतनू कुकडे याचा पाय खोलात असल्याचं बोललं जातंय.
विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून योग्य मदत मिळाली नाही-रविंद्र धंगेकर
यासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून (Shiv Sena – Uddhav Thackeray Faction) आंदोलन करण्यात आलं आहे. ठाकरे सेनेचे शहर प्रमुख संजय मोरे (Sanjay More) यांनी याबाबत राज्य सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे. तसेच नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी एक भली मोठी पोस्ट लिहीत शंतनू कुकडेवर गंभीर आरोप करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ते धंगेकरांनी कुकडेवर काय आरोप केलेत ते पाहुयात.

रवींद्र धंगेकरांच्या पोस्ट मध्ये काय? Ravindra Dhangekar on Shantanu Kukde
शंतनू कुकडे (Shantanu Kukde) नावाच्या एका नराधमावर पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशन (Samarth Police Station, Pune) मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर या व्यक्तीबद्दल यापूर्वी माझ्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्ही सबळ पुराव्यांची जुळवाजुळव करत होतो. हे प्रकरण केवळ बलात्कारापुरते मर्यादित नसून ही व्यक्ती धर्मांतराचे मोठे रॅकेट पुणे शहरात राबवते. गोरगरीब हिंदू कुटुंबांना टार्गेट करून त्यांचे बळजबरीने धर्मांतर घडवून आणले जाते. काही गरजू कुटुंबातील महिला व मुलींच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे प्रकार या नराधमाकडून केले जातात तसेच काही हाय प्रोफाईल व्यक्तींना मुली पुरवण्यापर्यंतचा उद्योग नराधम करतो. समर्थ पोलीस स्टेशन कडे याबाबत यापूर्वी तक्रारी दाखल होऊन देखील त्यांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केला आहे.
या शंतनु कूकडे (Shantanu Kukde) कडुन मिळणाऱ्या मलईमुळे संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी आजवर त्याला सांभाळून घेतात, या प्रकरणात देखील मुसा (Musa), मुनीर (Munir), प्रतीक (Pratik), सागर (Sagar), जैन (Jain) व पूनम (Poonam) आदी नामक व्यक्तींचा सहभाग असून हा तपास अतिशय थंड गतीने व चुकीच्या दिशेने सुरू आहे. माझी पोलीस प्रशासनास विनंती आहे की आपण या सगळ्या प्रकरणाची सीआयडी (CID) चौकशी करावी. कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू कुटुंबीयांची अश्या प्रकारची फसवणूक करत धर्मांतराचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. या नराधमाच्या बँक खात्यांची चौकशी केली असता देशाबाहेरील ट्रस्ट (Foreign Trusts) कडून कोट्यावधी रुपये धर्मांतरासाठी देणगी मिळाल्याचे देखील माहिती मिळाली आहे.
हिंदू म्हणजे काय विकाऊ वाटले का….? कोणी यावं पैसे द्यावे आणि त्यांचे धर्मांतर करून त्यांच्यावर अत्याचार करावे…? पुणे शहरात (Pune City) या पुढील काळात या सगळ्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. माझी सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा (Ajit Pawar) यांना देखील विनंती आहे. अशा प्रकारच्या नराधम व्यक्तीची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी. असं म्हणत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी कुकडेवर अतिशय गंभीर आरोप करत त्याची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी देखील अजित पवारांकडे (Ajit Pawar) केली आहे.
दरम्यान, आत्ता कुठेतरी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) चं प्रकरण कुठेतरी निवळत असताना शंतनू कुकडेच्या (Shantanu Kukde) या नवीन प्रकरणामुळे अजितदादांची (Ajit Pawar) डोकेदुखी वाढणार असल्याचा अंदाज आहे.
तर यावर तुमचे मत काय? ते कंमेंट करून कळवा…
विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून योग्य मदत मिळाली नाही-रविंद्र धंगेकर #vidhasabha #ravindradhangekar