Ram Navami Vastu Shastra हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व दिले जाते. यानुसार, घरात योग्य ठिकाणी देवी-देवतेची चित्रे लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जीवनात सुख, समृद्धी, आणि यश प्राप्त होते. मात्र, प्रत्येक चित्र योग्य दिशेला लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर चित्र चुकीच्या दिशेला लावले तर जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. श्रीरामाचे चित्र, जो दैवी शक्तीचा प्रतीक आहे, योग्य दिशेला लावल्यास घरात सुख, समृद्धी, आणि यश येते.

रामनवमी – शुभ दिन
रामनवमी हा भगवान श्रीरामाचा जन्मदिवस आहे, जो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला साजरा केला जातो. या वर्षी रामनवमी 6 एप्रिल रोजी येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाचे चित्र घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. राम दरबाराचे चित्र लावल्याने घरात सकारत्मकता येते आणि सौभाग्य वाढते.
कुठे लावावे श्रीरामाचे चित्र?
वास्तुशास्त्रानुसार, श्रीराम दरबाराचे चित्र घराच्या पूर्व दिशेला लावणे सर्वोत्तम आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुख-शांतीचा प्रवाह कायम राहतो. तसेच, घरातील सर्व वास्तु दोष नष्ट होतात. हे चित्र पूजागृहाच्या भिंतीवर देखील लावता येते, ज्यामुळे आपला घरातील वातावरण पवित्र आणि सुखी राहतो.
राम दरबाराची स्थापना का करावी?
श्रीराम दरबाराची स्थापना आपल्या घरात केल्याने आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. नियमित पूजा केल्याने घरात सौभाग्य आणि प्रगती मिळते. कुटुंबातील सदस्यांमधील भांडणं कमी होतात आणि एकमेकांमध्ये प्रेम वाढते. हे चित्र घरातील वातावरण स्वच्छ ठेवते आणि प्रत्येक सदस्याच्या जीवनात यश व समृद्धी आणते. विशेषत: रामनवमीच्या दिवशी श्रीरामाचे चित्र घरात लावणे तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येईल
