दक्षिण भारतीय सिनेमा इंडस्ट्रीतील एक प्रमुख अभिनेता Prabhas, ज्याने बाहुबली आणि साहो सारख्या चित्रपटांतून आपली अमिट छाप सोडली आहे, आता लग्नाच्या तयारीत आहे. प्रभासच्या चाहत्यांची त्याच्या लग्नाबद्दलची उत्सुकता काही थांबली नाही, परंतु आता एका मोठ्या आनंदाच्या बातमीची घोषणा केली आहे. प्रभास वयाच्या 45 व्या वर्षी लग्न करण्याच्या तयारीत आहे, आणि याबाबत त्याच्या कुटुंबाने तयारी सुरू केली आहे.
काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की प्रभास त्याच्या बाहुबली चित्रपटातील सहकलाकार अनुष्का शेट्टीसोबत लग्न करणार आहे, पण ही बातमी खोटी ठरली आहे. प्रभासच्या कुटुंबाने त्याच्यासाठी एक वधू शोधली आहे, ज्याच्याशी तो लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. या मुलीचे वडील हैदराबादचे एक मोठे व्यावसायिक आहेत. तसेच, या लग्नाच्या तयारीमध्ये प्रभासची मावशी, श्यामला देवी देखील सहभागी आहे.
प्रभासच्या कामाबद्दल
प्रभासच्या आगामी चित्रपटांचीही चर्चा सुरु आहे. 2024 मध्ये कलकी 2898 एडी चित्रपटाने धुमाकूळ घातला होता, ज्यामध्ये अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दीपिका पदुकोण यांसारखे दिग्गज कलाकार होते. या चित्रपटाने 1100 कोटींहून अधिक कमाई केली. त्यानंतर, प्रभास द राजा साब आणि फौजी या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. आणि स्पिरिट या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच प्रारंभ होणार आहे, जो संदीप रेड्डी दिग्दर्शित करणार आहे. याशिवाय, प्रभास 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या कन्नप्पा या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे.