Night walk and chicken purchase -
Trending

रात्रीची पदयात्रा आणि कोंबड्यांची खरेदी- Anant Ambani च्या रात्रीच्या पदयात्रेची संपूर्ण स्टोरी!

Spread the love

पाहिलं pre wedding मग wedding मग काय तर vantara आणि आता दुप्पट किंमतीत विकत घेतलेल्या कोंबड्या… मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा Anant Ambani गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चांच्या केंद्रस्थानी आहे. अश्यातच अनंत अंबानी पुन्हा चर्चेत आले आहेत. ज्याचं कारण आहे त्यांची रात्रीची पदयात्रा आणि या यात्रेदरम्यान दुपट्ट किंमतीत विकत घेतलेल्या कोंबड्या!

नेहमीच चर्चेत असणारा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सध्या त्यांच्या पदयात्रेमुळे परत एकदा चर्चेत आले आहेत. अनंत अंबानी जामनगर ते द्वारका ही 140 किलोमीटरची पदयात्रा करत आहे. ज्याचे अनेक व्हिडिओस वायरल होत असून सध्या त्यांची हि पदयात्रा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. अश्यातच या पद यात्रेदरम्यान, अनंत अंबानींनी एक दोन नाहीतर २५० कोंबड्या विकत घेतल्या आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. पण अनंत अंबानी हि पदयात्रा का करत आहे? आणि त्यांनी कोंबड्या का विकत घेतल्या असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ज्याची उत्तरे आपण जाणून घेऊयात.

सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे अनंत अंबानी हि पदयात्रा का करत आहे? तर त्याच कारण आहे, द्वारकाधीशांवरची श्रद्धा आणि वाढदिवसाचं औचित्य! अंबानी कुटुंबाची भगवान द्वारकाधीशांवर अत्यंत श्रद्धा आहे. या कुटुंबातील सर्वच सदस्य त्यांच्या आयुष्यात कोणतीही मोठी घटना घडल्यास, एखादं काम पूर्ण झाल्यास किंवा शुभ काम करण्यापूर्वी द्वारकाधीशांच्या दर्शनाला जातात. या महिन्यात अनंत अंबानी यांचा ३० वा वाढदिवस आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त अनंत अंबानी द्वारकाधीशांच्या दर्शनासाठी निघाले आहेत.

अनंत अंबानी यांनी 28 मार्च रोजी जामनगरमधील मोती खावडी येथील त्यांच्या घरापासून या पदयात्रेला सुरुवात केली असून जामनगर ते द्वारका ही 140 किलोमीटरची पदयात्रा करत ते 10 एप्रिल रोजी द्वारका येथे आपला 30 वा वाढदिवस साजरा करणार आहे. दिवसा पदयात्रा काढली तर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असून दिवसा इतकं चालणं सोपं नाही. यामुळे अनंत अंबानी यांनी रात्री प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. या पदयात्रेत ते प्रत्येक रात्री १० ते १२ किलोमीटर पायी चालत आहेत. तसेच वाटेत येणाऱ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत आहेत.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना “कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी मी भगवान द्वारकाधीशांचे नेहमी स्मरण करतो. तरुणांना माझा संदेश आहे की त्यांनी देवावर श्रद्धा ठेवावी, कारण जिथे देव आहे तिथे काळजी करण्याचे कारण नाही.” असा संदेश देखील अनंत अंबानी यांनी तरुणांना दिला आहे.

हीच पदयात्रा करत असताना अनंत अंबानींनी एका ट्रकमध्ये 250 कोंबड्या कत्तलखान्यात नेण्यात येत असल्याचं पाहिलं, आणि त्यांनी तात्काळ तो ट्रक थांबवून चालकाशी बोलून दुप्पट किमतीत कोंबड्या खरेदी केल्या. यानंतर एक कोंबडी हातात घेऊन पुढे जाताना अनंत यांनी “जय द्वारकाधीश” चा नारा दिला. तसेच आता आम्ही त्यांना पाळू असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

वन्यजीव प्राण्यांसाठी त्यांनी उभारलेल्या वनताराची चर्चा नेहमीच होत असते, अनेकजण याचे कौतुकही करतात, तर वनताराच्या माध्यमातून 2000 हून अधिक प्रजातींच्या 1.5 लाखांहून अधिक प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यांनी वन्यजीवांसाठी केलेल्या याच कामाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना नुकतेच ‘प्रणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरविले आहे. अश्यातच पद यात्रे दरम्यान त्यांनी कोंबड्याचा जीव वाचवल्याने पुन्हा एकदा त्यांचे प्राणी प्रेम पहायला मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *