Kajol Devgan
Bollywood सिनेमा

Kajol ने मुंबईत घेतलं आलिशान घर – किंमत ऐकून थक्क व्हाल!

Spread the love

Bollywood ची सुप्रसिद्ध अभिनेत्री Kajol हिने मुंबईतील सर्वात महागड्या आणि पॉश भागात नवं घर घेतलं आहे. या आलिशान घरामध्ये पाच कार पार्किंगसाठी खास जागा देखील आहे. काजोलच्या नव्या घराची कोटींच्या घरात जाणारी किंमत ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल!

बॉलिवूड सेलिब्रिटींची वाढती रिअल इस्टेट गुंतवणूक

सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी खरेदी करत आहेत. अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, अक्षय कुमार यांसारख्या सेलिब्रिटींनी आधीच वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या रकमेच्या मालमत्ता घेतल्या आहेत. आता काजोलनेही प्रॉपर्टी खरेदी करून या यादीत आपले नाव जोडले आहे. आपल्या अभिनयासोबतच तिच्या उत्साही स्वभावासाठी प्रसिद्ध असलेली काजोल आता तिच्या नव्या घरामुळे चर्चेत आहे.

मुंबईतील महागड्या भागात काजोलने घेतलं घर

काजोलने मुंबईतील सर्वाधिक महागड्या आणि हाय-फाय परिसरामध्ये घर विकत घेतलं आहे. बॉलिवूडमध्ये सध्या बऱ्याच सेलिब्रिटींनी नवीन घरे घेतली किंवा विकली आहेत, त्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन यांसारख्या स्टार्सनंतर काजोलनेही मोठी आर्थिक गुंतवणूक करत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

Kajol -Ajay

हा करार 6 मार्च 2025 रोजी झाला

काजोलने ही प्रॉपर्टी 6 मार्च 2025 रोजी खरेदी केली. या व्यवहारासाठी तिने ₹1.72 कोटी मुद्रांक शुल्क देखील भरले आहे. या व्यावसायिक जागेच्या खरेदीसह तिला पाच कार पार्किंग स्पेस मिळाले आहेत. याआधीही, 2023 मध्ये काजोलने ओशिवरा येथील सिग्नेचर बिल्डिंगमध्ये ₹7.64 कोटींना ऑफिस स्पेस विकत घेतली होती. ओशिवरा, वीरा देसाई रोड हा बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी एक हॉटस्पॉट मानला जातो, आणि काजोलनेही त्याच भागात आपले ऑफिस घेतले आहे.

अजय देवगणची मोठी गुंतवणूक

काजोलप्रमाणेच तिचे पती आणि प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणनेही 2023 मध्ये मुंबईत मोठी रिअल इस्टेट गुंतवणूक केली होती. त्याने एकूण पाच ऑफिस स्पेसेस खरेदी केल्या. त्यापैकी तीन कार्यालयांची किंमत ₹30.35 कोटी तर उर्वरित दोन कार्यालये ₹14.74 कोटींना खरेदी केली गेली.

मुंबईतील महागड्या भागात काजोलने घेतलं घर

काजोलने मुंबईतील सर्वाधिक महागड्या आणि हाय-फाय परिसरामध्ये घर विकत घेतलं आहे. बॉलिवूडमध्ये सध्या बऱ्याच सेलिब्रिटींनी नवीन घरे घेतली किंवा विकली आहेत, त्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन यांसारख्या स्टार्सनंतर काजोलनेही मोठी आर्थिक गुंतवणूक करत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *