सध्या लग्नसराई जोरात चालू आहे! अगदी सुपारी फोडणे, केळवण ते हळद उतरवण्याचा विधी सगळ्याचे रोज नवनवीन व्हिडिओस पहायला मिळत आहेत. ज्यातून लग्न कार्यावेळी किती वेगवेगळ्या प्रथा- परंपरा पाळल्या जातात हे आपल्याला पहायला मिळतंय. ज्यातील काही लग्नाच्या अगोदरच्या आहेत तर काही लग्ना नंतरच्या! पण यातील एक गोष्ट लग्नाआधी सुद्धा करावी लागते आणि लग्नानंतरही! ती म्हणजे देवदर्शन! लग्नाआधी देवदर्शन केल जातं, लग्नानंतर देवदर्शन केलं जात आणि लग्नानंतर Jejuri च्या खंडेरायाचे दर्शन तर हमखास घेतलं जात!
केळवण, सुपारी फोडणे अश्या काही प्रथा लग्नाआधीच्या असतात, तर हळद उतरवणे, जागरण गोंधळ अश्या गोष्टी लग्नानंतर केल्या जातात. पण देवदर्शन लग्नाआधी व लग्नानंतर दोन्ही वेळेस केलं जात. ज्यात कुटुंबाचे कुलदैवत, कुलदैवता, वधू व वर राहतं असलेल्या ठिकाणचे ग्रामदैवत, ग्रामदेवी, तसेच इतर महत्वाची व आसपासची देवस्थाने यांचे दर्शन घेतले जाते. लग्नाआधी वधू व वर त्यांच्या त्यांच्या परिवारासोबत हे देवदर्शन करतात. तर लग्न झाल्यावर नव विवाहित जोडपं एकत्र देवदर्शन करत. पण का?
सगळ्यात पाहिलं लग्नाआधी देवदर्शन का केलं जात?
सगळ्यात पाहिलं लग्नाआधी देवदर्शन का केलं जात? ते पाहुयात. लग्नाआधी केलं जाणार देव दर्शन वधू व वर दोघेही त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांसोबत करतात. यावेळी देवाचे मनोभावे दर्शन घेऊन देवांना लग्नाची पत्रिका दिले जाते, घरात होणाऱ्या शुभकार्याचे आमंत्रण दिलं जात. तर देवांना लग्नपत्रिका दिल्यानंतरच मग इतर नातेवाइकांना, पै पाहुण्यांना व मित्रमंडळींना पत्रिका देऊन त्यांना लग्नाचे आमंत्रण दिले जाते. तसेच यावेळी आमच्या कुटुंबात योजलेले लग्नकार्य कोणत्याही विघ्नाशिवाय सुरळीतपने पार पडावे अशी प्रार्थना देखील केली जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर होऊ घातलेल्या लग्नाला देवतांचा आशिर्वाद मिळावा व सगळ्यागोष्टी निर्विघ्न पार पडाव्यात म्हणून लग्नाआधी देवदर्शन केल जात.
लग्न झाल्यावर देवदर्शन केल जात?
लग्न झाल्यावर पुन्हा एकदा देवदर्शन केल जात. यावेळी नवविवाहित वधू व वर एकत्र जोडीने देवदर्शन करतात. जेणेकरून त्यांच्या लग्नाला देवी देवतांचा आशीर्वाद मिळावा व त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखकर व्हावं. तसेच लग्न कार्य सुरळीत व निर्विन्घ पार पडले म्हणून यावेळी देवाचे आभार देखील मानले जातात. यासोबतच लग्नानंतर देवदर्शन करण्याचा मुख्य हेतू म्हणजे नववधूला तिच्या नव्या कुटुंबाच्या कुलदेवतांची माहिती करून देणे. यावेळी सासरची मंडळी खासकरून सासू बाई नव वधूला तिच्या नव्या घराचे कुलदैवत कुलदेवता यांची ओळख करून देतात, त्यांचे महात्म्य, त्यांच्या पूजेची विधी याबद्दल माहिती देतात. तसेच जर कुठल्याहि जोडप्याने लग्नानंतर देव दर्शन न करता तशीच त्यांच्या संसाराला जर सुरवात केली तर त्यांच्या संसारात अर्थात वैवाहिक जीवनात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो असा देखील अनेकांचा समज आहे. त्यामुळे नादाम्पत्याचं वैवाहिक जेवण आनंददायी व्हावं यासाठी अनेकजण न चुकता लग्नानंतर देवदर्शन करतात.
आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे लग्नानंतर जेजुरीला का जातात? कोणत्याही देवस्थानाला गेले, नाही गेले, खंडोबा त्यांच कुलदैवत असू न असू तरीसुद्धा जेजुरीला अनेक जोडपी जातातच. ज्याची दोन महत्वाची कारणे सांगितली जातात. पाहिलं कारण म्हणजे एकतर जेजुरीचा खंडेराया हा महाराष्ट्रातील अनेक कुटुबांच कुलदैवत आहे, त्यामुळे कुलदैवताचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेकजण जेजुरीला जातात.
पण Jejuriला तर जावंच लागतंय! लग्न कार्यावेळी देवदर्शन का करतात?चा खंडेराया कुटुंबाचे कुलदैवत नसताना देखील अनेक जण जेजुरीला जातात. कारण जेजुरीचा खंडेराया हा आदिदेव असलेल्या शिव शंकर यांचा अवतार आहे तसेच म्हाळसा देवी या आदिशक्ती पार्वती देवीच्या अवतार आहेत, त्यामुळे शिवपार्वती सारखा नवजोडप्याचा संसार देखील सुखाचा व्हावा व त्यांना आदिदेव महादेव व माता पार्वती यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून कुलदैवत असो वा नसो अनेकजण जेजुरीला न चुकता जातात. तर ज्यांना जेजुरीला यायला जमत नाही ते कोल्हापूरच्या ज्योतिबाला अथवा त्यांच्या जवळच्या मार्तंड मल्हारीच्या मंदिरात जाऊन त्याचे आशीर्वाद घेतात. आता या पारंपरिक आणि पौराणिक कारणांसोबत लग्नानंतर जेजुरीला जाण्याचं एक डिजिटल कारण सुद्धा आहे. ते म्हणजे रील्स बनवणं. लग्न झाल्यावर बाकी काही करो वा न करो जेजुरीला जाऊन रील्स बनवणं मस्ट झालाय. त्यामुळे भंडारा उधळतानाची ती एक रील बनवायची म्हणून देखील अलीकडच्या काळात अनेकजण लग्नानंतर जेजुरीला जात आहेत.
