IPL 2025: फक्त एक टूर्नामेंट नाही, तर एक मोठी इंडस्ट्री बनली आहे. दरवर्षी खेळाडू, संघाचे मालक, ब्रॉडकास्टिंग कंपन्या आणि सरकार हेदेखील यावरून मोठी कमाई करतात. पण BCCI टॅक्स देत नसेल, तर आयपीएलच्या माध्यमातून सरकारची कोट्यवधींची कमाई कशी होते?
आईपीएल म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग, जगातील सर्वात महागडी आणि लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. प्रत्येक वर्षी आयपीएलमध्ये अब्जावधींची उलाढाल होते. हे केवळ क्रिकेट टूर्नामेंट नाही, तर एक मोठी इंडस्ट्री बनली आहे. आयपीएलमधून दरवर्षी खेळाडू, संघाचे मालक, ब्रॉडकास्टिंग कंपन्या आणि सरकार मोठी कमाई करतात.
आयपीएलची सर्वात मोठी कमाई मीडिया आणि ब्रॉडकास्टिंग राइट्समधून होते. स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमा यांच्यात २०२३ ते २०२७ पर्यंत IPL च्या ब्रॉडकास्ट राइट्ससाठी ४८,३९० कोटी रुपयांची डील झाली आहे. यावरून दरवर्षी १२,०९७ कोटी रुपयांची कमाई होईल. ही रक्कम BCCI आणि फ्रेंचाईझ यांच्या दरम्यान ५०-५० टक्क्यांमध्ये वाटली जाते.
तरीही, BCCI जर थेट टॅक्स देत नसेल, तरी मीडिया आणि संबंधित उद्योगांकडून मिळणारा टॅक्स सरकारच्या कमाईत मोठा भाग म्हणून जातो. आयपीएल आता फक्त एक टूर्नामेंट नाही, तर एक आर्थिक महाकुंभ बनला आहे!