Ravindra Jadeja News: भारतीय संघ लवकरच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. मात्र, या सामन्यातून स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाला वगळले जाऊ शकते, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
Champions Trophy 2025, IND vs BAN: भारतीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यात आज चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयी सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. मात्र, यावेळी संघात कोणाला संधी दिली जाणार आणि कोणाला डच्चू मिळणार, याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. याच दरम्यान, रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि रवींद्र जडेजा यांचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या फोटोनंतर चाहत्यांनी अंदाज बांधला की, रवींद्र जडेजाला अंतिम संघात स्थान मिळणार नाही.
संघात रवींद्र जडेजा खेळणार का?
मीडिया रिपोर्टनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघात रवींद्र जडेजाला वगळण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जडेजाला वगळण्यामागचे कारण संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केलेले नसले तरी क्रिकेट तज्ज्ञ त्यावर विविध अंदाज बांधत आहेत.
रवींद्र जडेजाच्या वगळण्यावर चर्चा का?
सोशल मीडियावर रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि रवींद्र जडेजाचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चर्चा अशी आहे की, भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि जडेजा यांच्यात दीर्घ चर्चा झाली. त्यामुळे हा फोटो पाहून क्रिकेटप्रेमींनी असा निष्कर्ष काढला की, जडेजाला अंतिम संघातून वगळले जाण्याची शक्यता आहे.
भारताचा माजी फिरकीपटू पीयूष चावलाने स्टार स्पोर्ट्सवरील चर्चेदरम्यान असे सांगितले की, बांगलादेश संघात डावखुरे फलंदाज अधिक आहेत. त्यामुळे भारतीय संघाला ऑफ स्पिनरची गरज असेल आणि त्यासाठी वॉशिंग्टन सुंदरला अंतिम संघात स्थान मिळू शकते.
भारत विरुद्ध बांगलादेश : हेड टू हेड रेकॉर्ड
आतापर्यंत भारत आणि बांगलादेश यांच्यात 41 एकदिवसीय सामने झाले आहेत, ज्यापैकी भारताने 32 विजय मिळवले आहेत. बांगलादेशने 8 सामने जिंकले असून, 1 सामना अनिर्णीत राहिला आहे. भारताने त्रयस्थ ठिकाणी बांगलादेशविरुद्ध 10 सामने खेळले असून, त्यापैकी 8 विजय मिळवले आहेत, तर 2 वेळा पराभव पत्करावा लागला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, हार्दिक पांड्या, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर.