Disha Salian Death Case, Mumbai: दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे, कारण तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत, सतिश सालियन यांनी दावा केला आहे की, त्यांची मुलगी दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. तसेच, या प्रकरणावर पुन्हा तपास करावा अशी मागणी केली आहे.
याचिकेत दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी गंभीर आरोप केले आहेत. वकील ओझा म्हणाले की, सीबीआयने दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात खोटं क्लीनचीट दिलं आहे. त्यांनी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतरांवर गँगरेप, मर्डर आणि विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
ओझा यांनी दिलेल्या खुलाशात सांगितलं की, आदित्य ठाकरे आणि सूरज पांचोली यांच्याविरोधात पुरावे आहेत आणि त्या दिवशी दिशा सालियानच्या फ्लॅटवर ते उपस्थित होते. तसेच, रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांच्यात 44 वेळा फोन कॉल्स झाले आहेत. वकिलांनी हे देखील सांगितले की, त्यांच्याकडे त्यांचं खटला जिंकण्यासाठी पुरावे आहेत आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी ते कोर्टाला याचिका दाखल करू इच्छित आहेत.
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात काही महत्त्वाचे पुरावे सापडले होते, जे हायकोर्टात सादर करण्याची मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे.