Dhanashree Verma's new album, the song's buzz on the day after the divorce!
Bollywood Cricket Sports

‘देखा जी देखा मैं’: Dhanashree Verma चा New Album, Divorce नंतर गाण्याची जोरदार चर्चा!

Spread the love

क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि Dhanashree Verma यांच्या घटस्फोटानंतर धनश्री वर्माने ‘देखा जी देखा मैं’ नावाचा अल्बम प्रदर्शित केला आहे. युजवेंद्र आणि धनश्री यांचा घटस्फोट २० मार्च रोजी झाला, आणि घटस्फोटाच्या दुसऱ्या दिवशीच या गाण्याची रिलीज होणे अनेकांच्या चर्चेचा विषय बनले आहे.

धनश्री वर्माच्या या गाण्याला टी-सीरिजने निर्मिती केली असून, ज्योती नुरन यांनी गायले आहे. गाण्याचे संगीत जानी यांनी दिले आहे आणि गाण्याचे बोल त्यांनीच लिहिले आहेत. गाण्याच्या बोलांमध्ये अगदी तीव्र भावना आहेत. ‘देखा जी देखा मैं, अपना का रोना देखा. गैरों के बिस्तर पे, अपनो का सोना देखा’ हे गाण्याचे खास बोल आहेत.

गाण्याच्या बोलांमध्ये एक दुसरी ओळ देखील आहे, “दिल तेरा बच्चा है, निभाना भूल जाता है. नया खिलौना देख के, पुराना भूल जाता है.” एकंदरीत, धनश्री वर्माचा अल्बम एक शक्तिशाली आणि भावनिक गाणं आहे, जो सध्या सोशल मिडियावर सर्वत्र चर्चा करत आहे.

गाण्याने धनश्रीच्या व्यक्तिगत जीवनाच्या नवीन अध्यायाला नवा वळण दिला आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट आणि त्यानंतरचे गाणे यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये अनेक चर्चांचे विषय उभे राहिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *