Swargate पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेल्या स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या Shivshahi Bus मध्ये 26 वर्षीय तरुणीवर पहाटेच्या सुमारास बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. तर या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असून, तो सध्या जामिनावर सुटलेला आहे. म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे? तेच जाणून घेऊयात
26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती. तरुणी पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट एसटी आगारात आली. नेहमी वर्दळ असणाऱ्या स्वारगेट ST डेपोत पहाटेची वेळ असल्याने जास्त माणसे नव्हती. फलटणला जाण्यासाठी कोणती बस आधी सुटेल, अशी विचारणा हि तरुणी करत होती. त्यानंतर बसची वाट पाहत ती बाकड्यावर बसली असताना, दत्तात्रय गाडे या गुन्हेगाराने तिला पलीकडची शिवशाही बस आधी सुटले, असे सांगितले. त्यावर फलटणची शिवशाही बस याच फलाटावर लागते, हे मला माहिती आहे, असे तरुणीने दत्तात्रय गाडेला म्हटले. दत्तात्रय गाडेकडे बघून या तरुणीला संशय आला होता, मात्र गाडेनी तिला संबंधांमध्ये खेळवत पलीकडची शिवशाही बस फलटणला आधी निघेल हे पटवलं.
दत्तात्रय गाडेच्या बोलण्यात येऊन ही तरुणी पलीकडच्या शिवशाही बसच्या दिशेने गेली. यावेळी दत्तात्रय गाडे तिच्यासोबतच होता. दुसऱ्या बसजवळ पोहचल्यावर त्या बसचे लाईट बंद असल्याने तरुणीला पुन्हा संशय आला. त्यावर दत्तात्रय गाडे याने तुम्ही एकदा बसमध्ये चढून खात्री करा, अस तरुणीला सांगितले. आणि ही तरुणी शिवशाही बसमध्ये चढल्यानंतर गाडेही तिच्या पाठोपाठ बसमध्ये शिरला आणि तिच्यावर अत्याचार करून तिथून पळ काढला.
संपूर्ण घटना घडल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत ही तरुणी फलटणला जाण्यास निघाली. मात्र नंतर ती परत आली आणि तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली आहे. तरुणीची तक्रार मिळताच स्वारगेट पोलिसांनी तातडीने एसटी आगारातीळ सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेज मुळे आरोपीची ओळख पटली असून तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल
तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला सोनसाखळी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती. तसेच संबंधित आरोपी दत्तात्रय गाडे जामिनावर सुटलेला आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. तर आठवड्याभरात पुण्यातील गुन्हयाची हि तिसरी घटना असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.