पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी Dattatray Gade ला तब्बल 70 तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी अटक केली. अत्याचार केल्यानंतर तो फरार झाला होता, मात्र पोलिसांनी 500 जवान, ड्रोन आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने त्याचा माग काढत त्याला जेरबंद केलं.
गावास लपून, रात्री शहरात सावज शोधायचा
प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आरोपी दत्ता गाडे हा दिवसा गावी थांबत असे आणि रात्री पुण्यात येऊन शिवाजीनगर, शिरूर, स्वारगेट एसटी स्टँडवर फिरत महिला सावज हेरायचा. गेल्या दोन महिन्याच्या मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे.
कारमध्येच पोलिसांसमोर कबुली
शिरूर तालुक्यातील गुनाट गावात लपलेला गाडे शुक्रवारी पोलिसांनी अटक केला. पुण्याकडे आणताना गाडीतच पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्याने बोलायला सुरुवात केली. त्याने पूर्वीही काही महिलांना अशा प्रकारे फसवल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांचा मोठा शोध मोहीम
गाडेला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी ड्रोन आणि डॉग स्क्वॉडसह गावभर शोध घेतला. तब्बल 70 तास तो पोलिसांपासून लपून राहिला. शेवटी, गुरुवारी रात्री त्याने एका नातेवाईकाच्या घरी जाऊन पाण्याची बाटली घेतली, तेव्हाच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतलं.