आजच्या बातम्या ताज्या बातम्या महाराष्ट्र

Chhgan Bhujbal NCP सोडून जाणार?

आता छगन भुजबळांनी केलेल्या या सूचक वक्तव्यानंतर त्यांनीच केलेल्या अजून एका वक्तव्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादी सोडून इतर कोणत्या नाही तर भाजपामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

छगन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेतच्या बैठकीनंतर “आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते” असं म्हटलं आहे त्यांच्या याच वक्तव्यातून छगन भुजबळ महायुतीवर नाही तर राष्ट्रवादी पक्षावर त्यातही खास करून अजित पवार व सुनील तटकरे यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय.

त्यामुळे राष्ट्रवादीवर नाराज असलेले छगन भुजबळ हे आता महायुतीतील भाजपामध्ये जाऊ शकतात अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

छगन भुजबळांच्या पक्षप्रवेशासाठी भाजपा देखील आग्रही राहू शकते. ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे दोन प्रमुख नेते होते. एक म्हणजे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि दुसरे म्हणजे छगन भुजबळ.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपने त्यांच्याकडचा ओबीसी नेता गमावला, त्यामुळे भाजपला त्यांच्या पक्षात एका ओबीसी नेत्याची गरज आहे. खास करून तेव्हा, जेव्हा राहून गांधी सातत्याने संसदेत जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. आणि भाजपाची हि गरज छगन भुजबळ यांच्या रूपाने पूर्ण होऊ शकते, त्यामुळे भाजप छगन भुजबळ यांच्या पक्षप्रवेशा संदर्भात आग्रही राहू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *