महाराष्ट्र Beed ताज्या बातम्या

छगन भुजबळ: “धनंजय मुंडेने राजीनामा का द्यावा? इतकी घाई का?

Chhagan Bhujbal ने नुकतंच Dhananjay Munde यांचं राजीनामा मागण्यावर सवाल केला आहे. “त्यांच्याबाबत कुठला आरोप सिद्ध झाला आहे, ज्यामुळे त्यांचा राजीनामा मागावा लागतो?” असं ते म्हणाले. भुजबळ यांच्या स्पष्ट वक्तव्यानं राजकीय वादाचं वातावरण तापवलं आहे. Dhananjay Munde चा राजीनामा मागण्याचं कारण काय? भुजबळ यांनी म्हटलं, की “Dhananjay Munde यांच्यावर अजून कोणताही ठोस आरोप सिद्ध झालेला नाही, मग त्यांचा राजीनामा का मागितला जातो?” असं विचारत त्यांनी राजीनामा मागणाऱ्यांना प्रश्न केला. यावेळी, Dhananjay Munde यांच्या विरोधात राजकीय दबाव वाढत चालला आहे. राजीनाम्याचं तातडीचं कारण? भुजबळ पुढे म्हणाले, “जोपर्यंत ठोस पुरावा नाही, तोपर्यंत राजीनाम्याची घाई का?” त्यांनी जोपासलेलं तत्त्वज्ञान असं आहे की, “काहीही सिद्ध झालेलं नसताना राजीनामा घेणं योग्य नाही. राजकारणामध्ये असे अनेक वाद होतात, पण यापूर्वी मी Telgi Scam मध्येही असं भोगलं आहे.” राजकारणात प्रत्येकावर अन्याय नको! भुजबळ यांनी राजकारणातील असं वर्तन खूप सामान्य आहे असं सांगितलं, पण त्याचबरोबर ते म्हणाले, “माझ्या मते, कुणावरही अन्याय होऊ नये. जर ठोस पुरावे नाहीत, तर त्याला योग्य न्याय दिला जावा.” त्याने हे स्पष्ट केलं की, प्रत्येक व्यक्तीला पूर्णपणे तपासले जातं, तेव्हाच योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे. राजीनामा मागण्याच्या मागे काय आहे? भुजबळ यांनी Devendra Fadnavis यांचं नाव घेतलं, ज्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, “पूर्ण चौकशी झाल्यावरच कारवाई होईल.” मग असं राजीनामा मागण्याचं कारण काय? भुजबळ यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तमनात मोठं चर्चेला चालना दिली आहे. भुजबळ यांच्या वक्तव्याने राजकारणात योग्य आणि न्यायपूर्ण प्रक्रिया हवी असल्याचं लक्ष वेधलं आहे. योग्य पुरावे न मिळेपर्यंत कोणाचाही निष्कर्षावर पोहोचणं, हे योग्य नाही.

ताज्या बातम्या Beed आजच्या बातम्या

Manoj Jarange Patil : ‘यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही…’ प्रतिक्रिया

Manoj Jarange Patil : ‘यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही…’ प्रतिक्रिया लेखक: Maharashtra katta | तारीख: 04 जानेवारी, 2025 मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाल्याची माहिती आहे. हे दोन मुख्य आरोपी आहेत. या अटकेनंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आता एक काम सरकारकडून होणं गरजेचं आहे. या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे. खंडणीच्या आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. सरकारने यात अजिबात हयगय करु नये. कारण यामध्ये मोठं रॅकेट आहे” असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. “पुण्यातून सगळ्यांना पकडलं जातय याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्याच प्रचंड राजकीय पाठबळ आहे. यांना कोण संभाळतय, त्यांना सुद्धा सरकारने अटक करावी” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. “देशमुख बांधवाची क्रूर पद्धतीने हत्या झाली. आरोपीला संभाळण्यात यांना मोठेपणा वाटतो. हे कोण आहेत? यांना आरोपीला भाकरी द्यावीशी वाटते. आरोपीला संभाळतात. त्यांना ऐशोआराम देतात. आरोपीने कोणाच्या तरी लेकाचा, लेकीच्या बापाचा खून केलाय. तुम्ही त्यांना संभाळताय. सरकारने यांना पाठिशी घालू नये. हे रॅकेटच आहे” — मनोज जरांगे पाटील Share this post: WhatsApp Instagram Facebook Twitter

Beed Uncategorized ताज्या बातम्या महाराष्ट्र

सुरेश धस यांनी उलगडले बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे रहस्य

आजवर अनेकांनी बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केले, पण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम उलगडून एक धक्कादायक कहाणी सांगितली. सुरुवातीला सुरेश धस यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे यांच्या इन्व्हॉल्व्हमेंटबद्दल चर्चा केली. “यांचा मुख्य आका कोण?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले की आम्हीही याचा शोध घेत आहोत. धस यांनी सुदर्शन घुलेवर आरोप करत त्याच्या आर्थिक स्त्रोतांबद्दल शंका उपस्थित केली. त्यांनी सांगितले की या प्रकरणातील आरोपींनी एका मोठ्या कटाची योजना आखली होती. सरपंचांच्या हत्येमागची मन हेलावून टाकणारी कहाणी सरपंचांच्या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की पिस्तूल असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून ती काढून घेण्यात यावी. सरपंच संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे आणि सुरेश धस यांचे भावनिक भाषण ऐकल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Beed ताज्या बातम्या महाराष्ट्र

Walmik Karad Connection -Santosh Deshmukh हत्या प्रकरण-Beed

बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोप बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोप 3 जानेवारी 2025 | लेखक: Maharashtra Katta बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्येत परळीचे आमदार आणि महायुती सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचे आरोप केले जात आहेत. तर याबाबत बोलताना “वाल्मिक कराड माझे निकटवर्तीय आहेत तर आहेत” असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलंय म्हणूनच धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय व बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड कोण आहेत? तेच जाणून घेऊयात वाल्मीक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष होते. मागील दहा वर्षांपासून वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या मतदारसंघातील संपूर्ण कारभार वाल्मीक कराडच पाहतात. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मीक कराड नागरिकांच्या समस्या सोडवतात. तर वाल्मिक कराड यांचा इतिहास पाहता यापूर्वी देखील 307 सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात. तर सध्याच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येत असून बीडच्या केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे. जो धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचा जवळचा मानला जातो. वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी सुद्धा त्यांच्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर बीडमध्ये वाल्मिक कराडने शिंदे नावाच्या अधिकाऱ्याला घुलेच्या फोनवरून धमकी दिली. तसेच, घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं दोन कोटींची खंडणी मागितली. हाच घुले नामक इसम सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी आहे. मात्र, फक्त वाल्मिक कराड याच्यावर दोन कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल केला. सरपंचचांच्या हत्या प्रकरणात कराडला का आरोपी केले जात नाही?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला होता. संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा संशय तेथील गावकऱ्यांनी देखील व्यक्त केला आहे असं म्हणत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अंबादास दानवे यांनी देखील हे प्रकरण विधिमंडळात उचलून धरले. आणि वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन थेट मंत्री धनंजय मुंडेंकडे बोट दाखवले होते. तर यावर उत्तर देताना “एका तरुण सरपंचाचा खून करण्यात आला हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतलं आहे. याप्रकरणात पीएसआय सस्पेंड आहे. तर, येथील पीआय अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल आहे. आरोपी कुणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे, त्याला अटक केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. AI टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी विधानपरिषदेत बोलताना सांगितलं आहे. तर यावेळी आरोपी मंत्र्यांचे जवळचे आहेत, असे बोलणं योग्य नाही असं सांगायला देखील फडणवीस विसरले नाहीत. तर या सगळ्या प्रकरणावर तुमचे मत काय तर कंमेंट करून नक्की सांगा.

Beed ताज्या बातम्या

Beed Santosh Deshmukh हत्याकांड प्रकरण – Suresh Dhas

आजवर अनेकांनी बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील घटनाक्रम सांगितला, त्याबद्दल भाष्य केलं पण सुरेश धस यांनी बीड हत्या प्रकरणाचा अतिशय तपशीलवार घटनाक्रम सांगून या पूर्ण घटनेची सर्वांना थक्क करून सोडणारी कहाणी सांगितली. त्यामुळे नक्की सुरेश धस त्यांच्या भाषणात काय म्हणालेत तेच पाहुयात. सुरुवातीला सुरेश धस यांनी बीड प्रकरणातील अगदी सुरवातीपासूनचा घटनाक्रम सांगत, विष्णू चाटे याच्या या प्रकरणातील इन्व्हॉल्व्हमेंट बद्दल भाष्य केलं. तर पुढे यांचा कोण आका आहे? असा सवाल देखील उपस्थित केला. तर यावर विरोधकांना उत्तर देत तुमच्याप्रमाणे आम्ही देखील या आकाच्या शोधात आहोत असं सुरेश धस म्हणाले. प्रकरणातील पुढील घटनाक्रम सांगताना सुरेश धस यांनी सुदर्शन घुले नामक इसमावर टीका केली व ज्याचं घर चार-पाच पत्र्याचं आहे तो स्कॉर्पिओ मध्ये कसा काय फिरू शकतो? त्याला स्कॉर्पिओ कोणी दिली हे शोधणं महत्त्वाचं आहे. असं म्हणत प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाबाबत पुढे बोलत असताना मी या सर्व प्रकरणाची माहिती घेतली आहे आणि त्यानुसार या सगळ्यांनी एक प्लॅन केला असं म्हणत सुरेश धस यांनी आरोपींचा काय प्लॅन होता ते सांगितलं. यापुढे सुरेश धस यांनी या प्रकरणातील सर्वांना हादरवून टाकणारी कहानी सांगितली. तर बीड जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांकडे पिस्तूल आहेत, त्या त्या लोकांचे पिस्तूल आपण काढून घ्यावे यासाठी अध्यक्षांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती केली. सुरेश धस यांनी त्यांच्या भाषणात या प्रकरणावरून ग्रामस्थांचा संताप का झाला, या मागील कारण देखील स्पष्ट केला आहे. अशाप्रकारे सुरेश धस यांनी बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मनाला अतिशय वेदना देणारी कहानी सांगत, भावनिक पद्धतीने भाषण दिले. तर यावर तुमचे मत काय? कमेंट करून नक्की सांगा

Beed ताज्या बातम्या

Yogeshwari Devi Story-Beed

देवी योगेश्वरी: कोकण व मराठवाड्याचा अद्वितीय सांस्कृतिक दुवा बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठावर वसलेली आंबाजोगाई नगरी मार्गशीर्ष महिन्यात भक्तांच्या गजबजाटाने फुलून जाते. याचं कारण म्हणजे देवी योगेश्वरी, जी कोकणातील अनेक कुटुंबांची कुलदैवत मानली जाते. बीडच्या भूमीत वसलेल्या या देवीचा कोकणाशी नेमका काय संबंध आहे? देवी योगेश्वरी कोकणातील कुटुंबांची कुलदेवता कशी बनली? चला, जाणून घेऊया. देवी योगेश्वरीची पौराणिक कथा योगेश्वरी देवीला साक्षात आदिमाया आदिशक्तीचे रूप मानले जाते. तिच्या अवतारामागे एक पौराणिक कथा प्रचलित आहे. दांतसूर नावाच्या असुराचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले. दांतसूराचा पराभव केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली. यामुळे या स्थळाला आंबाजोगाई असे नाव मिळाले. दांतसूरावर विजय मिळवल्यामुळे तिला दांतसूरमर्दिनी असेही संबोधले जाते. देवीच्या कुमारिका स्वरूपाची कथा योगेश्वरी देवी कुमारिका असल्याचे सांगितले जाते. परळीच्या वैजनाथांशी तिचा विवाह ठरला होता, पण लग्नाचा मुहूर्त चुकल्याने विवाह होऊ शकला नाही. यामुळे योगेश्वरी देवीने आंबाजोगाईतच वास्तव्य केले. कोकणातील कुलदैवता कशी झाली? भगवान परशुरामांनी कोकण भूमीची निर्मिती केल्यानंतर काही कुटुंबे कोकणात नेली. या कुटुंबांच्या विवाहासाठी त्यांनी अंबाजोगाईच्या मुली निवडल्या. योगेश्वरी देवीने या विवाहासाठी एक अट ठेवली—“या मुलींच्या कुलाची मी कुलदेवता असेन.” त्यामुळे कोकणातील अनेक कुटुंबांची देवी योगेश्वरी कुलदैवता बनली. आजही श्रद्धेचा केंद्रबिंदू देवी योगेश्वरी ही केवळ धार्मिक नाही तर कोकण व मराठवाड्याला सांस्कृतिकदृष्ट्या जोडणारी महत्त्वाची कडी आहे. मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, गोवा यांसारख्या ठिकाणांहून असंख्य भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. तुम्ही कधी देवी योगेश्वरीचे दर्शन घेतले आहे का? तुमचे अनुभव आणि विचार आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा!

Beed Trending आजच्या बातम्या

Beed प्रकरणाच्या आधीपासून Suresh Dhas विरुद्ध Pankaja व Dhananjay Munde असा संघर्ष कसा चालू झाला?

सध्या महाराष्ट्रात लोक सर्वात जास्त जर कोणत्या बातमीची वाट पाहत असतील तर ती म्हणजे वाल्मिक कराड याच्या अटकेची आणि असच काहीस सध्या झालय. अखेर मस्साजोग प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडला अटक केली आहे. दरम्यान वाल्मिक कराड याच्या अटके मुळे आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढे काय होणार? धनंजय मुंडेंवर या अटकेचा काय परिणाम होणार ते जाणून घेऊयात वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आल्याने आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळणार असल्याचं बोललं जात असून, या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीड येथील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड कडे एक मुख्य आरोपी आणि सूत्रधार म्हणून बघितलं जात होत, त्यामुळे आता पोलीस चौकशीमध्ये वाल्मिक कराड कोणते नवे खुलासे करणार, वाल्मिक कराडच्या स्टेटमेंट मध्ये कोणती नवी नावे समोर येणार का या कडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहील आहे. दरम्यान वाल्मिक कराड आता पोलिसांच्या ताब्यात असल्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेग मिळून लवकरच या हत्या प्रकरणातील खरा आरोपी कोण आहे? संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली? त्यांच्या हत्ये मागील नेमकं काय कारण होत? हे समोर येऊन संतोष देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडचा अँगल समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे मानले जात असल्याने आरोपी वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंची साथ आहे, धनंजय मुंडेंचा वरदहस्त असल्याने वाल्मिक कराड मोकाट आहे, त्याला अजूनही अटक झालेली नाही असे आरोप देखील धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आले होते, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजकीय अस्तित्वाव देखील धोक्यात आलं होतं, म्हणूनच याचा धनंजय मुंडेंच्या राजकारणावर काय परिणाम होणार तेही पाहुयात. बीड येथील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड च नाव जोडलं गेल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, ज्यात महायुतीमधील नेत्यांचा देखील समावेश होता. तसेच “आकाचा आका” म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड वर वरदहस्त असल्याचं देखील सूचित केलं होतं. तर माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन आरोपींना शिक्षा होई पर्यंत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आता या सगळ्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केली जाणारी मागणी बंद होईल आणि धनंजय मुंडे यांना त्यांचं मंत्रिपद कायम ठेवता येईल असं बोललं जातंय. दरम्यान या प्रकरणावरून मराठा विरुद्ध ओबिसि वाद पुन्हा एकदा उफाळला होता. आणि या वादाच्या केंद्रस्थानी धनंजय मुंडे होते. मात्र आता आरोपी वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात असल्याने बीड मध्ये चालू झालेला हा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष कमी होईल व ओबिसि नेते असणाऱ्या धनंजय मुंडे यांना याची कमी झळ बसण्याची शक्यता आहे. बीड येथील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या प्रमाणे धनंजय मुंडे यांना सर्वपक्षीय नेत्यांनी घेरलं होत, त्याचप्रमाणे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा लावून धरत महायुतीसरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील विरोधकांकडून घणाघाती टीका करण्यात येत होती. तर महायुती सरकारच्या कार्य क्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. पण आता अखेर वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात असल्याने महायुतीसरकार वर होणारी हि चिखलफेक कमी होणार असल्याचं दिसतंय. तर तुम्हाला काय वाटतं, खरंच वाल्मिक कराड च्या अटकेचा धनंजय मुंडे यांना फायदा होणार का ते कंमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला काय वाटतं, वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेल्याने धनंजय मुंडे यांना फायदा होणार का ते कंमेंट करून नक्की सांगा