रविवारी झालेल्या भारत-इंग्लंड टी-20 सामन्यात भारताने दमदार खेळ करत 150 धावांनी मोठा विजय मिळवला. संपूर्ण देशात सेलिब्रेशन सुरू होतं, आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेतला. याच सामन्याला उपस्थित असलेले Amitabh Bachchan आणि Abhishek Bachchan यांनी विजय साजरा करण्यासाठी एक वेगळाच मार्ग निवडला जेवण!
सामना संपल्यानंतर, बाप-लेकाच्या जोडीने एका 84 वर्ष जुन्या शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये थांबून खास साउथ इंडियन फूडचा आनंद घेतला. पण विशेष म्हणजे त्यांनी ना पनीर, ना बिर्याणी – तर पारंपरिक आणि ट्रेंडिंग पदार्थांची चव चाखली!
बच्चन पिता-पुत्रांनी निवडलेलं खास ठिकाण – मद्रास कॅफे!
Rava Dosa (क्रिस्पी आणि हलका)
Ragi Dosa (न्याहारीसाठी पौष्टिक पर्याय)
Tuppa Dosa (तुपात परतलेला स्वादिष्ट डोसा)
Dahi Misal (मिसळ पावचा एक अनोखा प्रकार)
Idli with Molgapodi (Gunpowder Chutney)
Medu Vada (परफेक्ट स्नॅक)
संपूर्ण जेवण शुद्ध शाकाहारी आणि हेल्दी होतं!
मुंबईतील किंग्ज सर्कल गार्डनजवळील मद्रास कॅफे हे एक 84 वर्ष जुनं आणि प्रसिद्ध साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे. इथल्या पदार्थांची चव आणि गुणवत्ता आजही तितकीच अप्रतिम आहे.
रेस्टॉरंट मालक देवव्रत कामथ यांना अचानक एक फोन आला:
“सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन तुमच्या रेस्टॉरंटमध्ये येत आहेत!”
त्यांनी सुरुवातीला विश्वास ठेवला नाही, पण काही वेळातच 16 सिक्युरिटी गार्ड्सच्या ताफ्यासह बच्चन पिता-पुत्र रेस्टॉरंटमध्ये पोहोचले.
बच्चन कुटुंबीयांना पाहून संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये उत्साहाचं वातावरण होतं