Beed Trending आजच्या बातम्या

Beed प्रकरणाच्या आधीपासून Suresh Dhas विरुद्ध Pankaja व Dhananjay Munde असा संघर्ष कसा चालू झाला?

Spread the love

सध्या महाराष्ट्रात लोक सर्वात जास्त जर कोणत्या बातमीची वाट पाहत असतील तर ती म्हणजे वाल्मिक कराड याच्या अटकेची आणि असच काहीस सध्या झालय. अखेर मस्साजोग प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडला अटक केली आहे. दरम्यान वाल्मिक कराड याच्या अटके मुळे आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढे काय होणार? धनंजय मुंडेंवर या अटकेचा काय परिणाम होणार ते जाणून घेऊयात

वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आल्याने आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळणार असल्याचं बोललं जात असून, या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीड येथील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड कडे एक मुख्य आरोपी आणि सूत्रधार म्हणून बघितलं जात होत, त्यामुळे आता पोलीस चौकशीमध्ये वाल्मिक कराड कोणते नवे खुलासे करणार, वाल्मिक कराडच्या स्टेटमेंट मध्ये कोणती नवी नावे समोर येणार का या कडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहील आहे. दरम्यान वाल्मिक कराड आता पोलिसांच्या ताब्यात असल्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेग मिळून लवकरच या हत्या प्रकरणातील खरा आरोपी कोण आहे? संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली? त्यांच्या हत्ये मागील नेमकं काय कारण होत? हे समोर येऊन संतोष देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडचा अँगल समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे मानले जात असल्याने आरोपी वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंची साथ आहे, धनंजय मुंडेंचा वरदहस्त असल्याने वाल्मिक कराड मोकाट आहे, त्याला अजूनही अटक झालेली नाही असे आरोप देखील धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आले होते, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजकीय अस्तित्वाव देखील धोक्यात आलं होतं, म्हणूनच याचा धनंजय मुंडेंच्या राजकारणावर काय परिणाम होणार तेही पाहुयात.

बीड येथील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड च नाव जोडलं गेल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, ज्यात महायुतीमधील नेत्यांचा देखील समावेश होता. तसेच “आकाचा आका” म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड वर वरदहस्त असल्याचं देखील सूचित केलं होतं. तर माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन आरोपींना शिक्षा होई पर्यंत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आता या सगळ्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केली जाणारी मागणी बंद होईल आणि धनंजय मुंडे यांना त्यांचं मंत्रिपद कायम ठेवता येईल असं बोललं जातंय.

दरम्यान या प्रकरणावरून मराठा विरुद्ध ओबिसि वाद पुन्हा एकदा उफाळला होता. आणि या वादाच्या केंद्रस्थानी धनंजय मुंडे होते. मात्र आता आरोपी वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात असल्याने बीड मध्ये चालू झालेला हा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष कमी होईल व ओबिसि नेते असणाऱ्या धनंजय मुंडे यांना याची कमी झळ बसण्याची शक्यता आहे.

बीड येथील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या प्रमाणे धनंजय मुंडे यांना सर्वपक्षीय नेत्यांनी घेरलं होत, त्याचप्रमाणे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा लावून धरत महायुतीसरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील विरोधकांकडून घणाघाती टीका करण्यात येत होती. तर महायुती सरकारच्या कार्य क्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. पण आता अखेर वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात असल्याने महायुतीसरकार वर होणारी हि चिखलफेक कमी होणार असल्याचं दिसतंय.

तर तुम्हाला काय वाटतं, खरंच वाल्मिक कराड च्या अटकेचा धनंजय मुंडे यांना फायदा होणार का ते कंमेंट करून नक्की सांगा

तर तुम्हाला काय वाटतं, वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेल्याने धनंजय मुंडे यांना फायदा होणार का ते कंमेंट करून नक्की सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *