Surya Grahan 2025: वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आज, 29 मार्चला लागणार आहे. हे एक आंशिक सूर्यग्रहण असून भारतात दिसणार नाही. पण ज्योतिषानुसार याचा प्रभाव सर्व 12 राशींवर होणार आहे.
खास संयोग:
सूर्य मीन राशीत प्रवेश करतोय. यासोबत शुक्र, राहू, बुध आणि चंद्र यांचा पंचग्रही योग निर्माण होतोय. हा योग काही राशींसाठी शुभ ठरणार आहे.
राशीप्रमाणे नशीब बदल:
- मकर रास (Capricorn): शनीदेवाचे संक्रमण आणि सूर्य, बुध, शुक्र, राहू यांचा योग तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. भाऊ-बहिणीशी संबंध दृढ होतील. समाजात सन्मान मिळेल.
- कुंभ रास (Aquarius): कुटुंबातील वाद संपतील. गुंतवणुकीतून नफा होईल. प्रॉपर्टी गुंतवणुकीसाठी शुभ वेळ. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील.
- धनु रास (Sagittarius): ग्रहस्थिती बदलामुळे जीवनात सकारात्मक बदल होतील. ठेवलेली कामं पूर्ण होतील. धार्मिक कार्यात रस वाढेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.
(टीप: वरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)