Solapur जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पिलीव गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 32 वर्षीय अंकुश खुर्द याचा अंगावर सळईचे चटके देऊन निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
Beed पॅटर्नची पुनरावृत्ती?
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अत्याचाराच्या आणि क्रौर्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नृशंस हत्या, तसेच जालना जिल्ह्यात तरुणाला चटके देऊन मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता माळशिरसमध्येही अशाच प्रकारची क्रूर हत्या घडल्याने चिंता वाढली आहे.
हत्या अनैतिक संबंधातून?
पोलिस तपासानुसार, अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या पद्धतीने अंकुश खुर्द याला चटके देऊन हालहाल करून मारले गेले, त्यावरून क्रौर्याच्या सीमा पार झाल्या आहेत.
पोलिसांनी घेतला आरोपीला ताब्यात
या घटनेत स्थानिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. हत्या नेमकी कशामुळे झाली? आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास सुरू आहे.