भिलवडीत सोमवारी आखरी रास्ता..रास्ता रोको..
भिलवडीत रस्त्या संदर्भात व्यापारी व नागरिक आक्रमक..
भिलवडी: प्रतिनिधी
भिलवडी गाव हे पलूस तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून भिलवडीचा नावलौकिक आहे.आजूबाजूच्या बारा गावांची राजधानी म्हणून भिलवडी ओळखली जाते.पानटपरी पासून बझार,मोठ्या कापड दुकानापर्यंत सगळी दुकानं येथे आहेत.शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेला ताजा भाजीपाला सुद्धा रोजच्या रोज भिलवडीत मिळतो. रविवारी बाजार असतो पण रोजचीच स्थिती बाजारासारखीच असते. गर्दीने नेहमीच गजबजलेली ही भिलवडीची बाजारपेठ आहे. कोल्हापूर ते तासगाव राज्यमार्गचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे. भिलवडी बाजारपेठेतला रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार गटारी रुंदीकरण व बंदिस्त होणार होते. पण कित्येक महिने गेले पण झालं अस की गटारी उंचावर केल्या आहेत.दुकानदार दिसत नाही. त्या गटारी वरून ग्राहकांनी ये-जा करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.दसरा दिवाळी तोंडावर आली आहे सणासुदीचे दिवस आहेत.प्रशासनाला व ठेकेदाराला एका ठोक्यात रस्ता कधी करणार आहे..? हे विचारायची वेळ आलेली आहे असे म्हणत व्यापारी वर्ग आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. भिलवडी बाजार पेठेतला ग्राहक कमी होत आहे.अनेक कारणांबरोबर हे ही एक प्रमुख कारण बनले आहे याचे सुद्धा आपण विचार करायला हवा असे म्हणत सोमवार दि. २६ सप्टेंबर २२ रोजी रास्ता रोको करून आंदोलन करणार असल्याचा आक्रमक पवित्रा व्यापारी आणि नागरिकांनी घेतला आहे.
गेल्या अधिवेशनामध्ये पलूस-कडेगावचे आमदार माजी मंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी विधानसभेमध्ये रस्त्याच्या संत गतीने सुरू असलेल्या कामाबाबत लक्षवेधी मांडली होती. ह्याचा विचार प्रशासनाने करायला हवा अशी मागणी होत आहे..